shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धारुर तालुक्यातील वृक्षमित्र हरवला; ह.भ.प. शिवाजी महाराज तोंडे यांचे निधन..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-

किल्लेधारूर  तालुक्यातील सोनिमोहा येथील ह.भ.प. शिवाजी महाराज तोंडे (वय ५२) यांचे आज गुरुवारी (दि.२७) पहाटे ४ : ११ मिनट निधन झाले. ते किर्तनकार व वृक्षमित्र म्हणून परिचित होते.

धारुर  तालुक्यातील सोनीमोहा येथील वृक्षप्रेमी  ह.भ.प. शिवाजी महाराज तोंडे धारूर तालुक्यात सुपरिचित होते. सतत सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन समाजजागृती करण्यात त्यांचे मोलाचे कार्य होते. त्यांचे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास दीर्घ आजारामुळे अंबाजोगाई   येथील शासकीय रुग्णालयांमध्ये  उपचार घेत असताना निधन झाले. 


ह.भ.प. शिवाजी महाराज तोंडे यांनी आपल्या किर्तन सेवेच्या माध्यमातून समाजप्रबोधन  त्याचबरोबर महाराष्ट्रभर वृक्ष लागवड व संगोपन यावर शेकडो व्याख्याने देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी गंगाबाई,  तीन मुलं बिभीषण तोंडे, अनिल तोंडे, गोपीनाथ तोंडे, सुना अश्विनी बिभीषण तोंडे, तेजस्विनी अनिल तोंडे चार नातवंडे आर्या, अनुश्री,भाग्यश्री,यशश्री तोंडे  असा परिवार आहे.

सोनीमोहा येथील पाणी फाउंडेशनची वॉटर कप  स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ह.भ.प. तोंडे महाराज यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सोनिमोहा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या ५२ व्या वर्षी तोंडे महाराजांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या दुख्खद निधनाने धारूर तालुक्यात व सोनिमोहा गावावरती शोककळा पसरली आहे.

आज (दि.२७) गुरुवारी दुपारी १२.३० वाजता सोनिमोहा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या  निधनामुळे तालुक्यातील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा कार्यकर्ता व वृक्षमित्र   हरवला आहे. तोंडे यांच्या अकाली निधनामुळे सोनिमोहा गावावर शोककळा पसरली आहे.
close