पूर्णा । प्रतिनिधी :-
पूर्णा तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथील दिव्यांग बांधवांना राशन मिळत नसल्याची तक्रार हिवरा येथील दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के यांच्याकडे केली होती.
यावेळी शिवहार सोनटक्के यांनी सर्व दिव्यांग बांधव व शेतकरी यांनी तहसीलदार यांची भेट घेतली.. यावेळी दिव्यांग बांधव व शेतकरी यांनी राशन बाबत गाऱ्हाणं मांडताच राशन दुकानदार यांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले.
त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवाना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले.

