दिनांक 22 फेब्रुवारी 2012 रोजी सकाळी 11 वाजता.देहरे तालुका नगर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत, तसेच पंचायत समिती नगर व सेंट्रल बँक ऑफ इंडिया देहरे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
देहरे । प्रतिनिधी:- या कार्यक्रमप्रसंगी देहरे संरपच हिराबाई करंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद अहमदनगरचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके,राजेंद्र क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, रुद्र दत्त क्षेत्रीय प्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मयूर जामगांवकर शाखा अधिकारी देहरे, सुनीलकुमार पठारे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोमनाथ जगताप जिल्हा अभियान व्यवस्थापक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर,सेंट्रल बँक ऑफ इंडिया देहरे शाखेतील निखिल मिश्रा व त्यांचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य व्हि.डी. काळे,माजी सरपंच विश्वासजी जाधव, सनी लांडगे, महेश काळे, मोहिते सर, गव्हाणे सर, बचत गटातील देहरे गटातील सर्वच सीआरपी, अध्यक्ष, सचिव,व सदस्या आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

