श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :- अराजकीय सामाजिक संघटना असलेल्या चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी श्रीरामपूर तालुका चर्मकार बांधवांच्या तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा संघटक दिलीप शेंडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजातील काही घटक उपेक्षित आहेत.आणि आज अनेक अडीअडचणी अनेक संकटे समाजासमोर उभी आहेत. समाजाला कुठेतरी आधार मिळावा,न्याय मिळावा तसेच समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन भविष्यातील योग्य नियोजन व्हावे ही आजची खरी गरज आहे.तसेच आजही काही ठिकाणी जातीभेद,द्वेष,पसरवले जातात,आणि यातून समाजातील गरीब घटकांना त्रास होतो,त्याचे निवारण होणे गरजेचे आहे.
आपले राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, शिक्षणमहर्षी महात्मा फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जपणारे आणि धर्मनिरपेक्ष तथा पुरोगामी राज्य आहे.परंतु आज खरोखर ही विचार धारा जपली जात आहे का ॽ.आपण आणि आपला इतर समाज हा खरोखर भयमुक्त आणि सुरक्षित आहे काॽ आणि हे सर्व बदलायचे असेल तर आपल्याला सर्वांना संघटित झाल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही नसल्याचे यामध्ये म्हटले आहे.
आपण जर आज समाजासाठी काही केलें नाही.तर पुढील पिढ्या सुद्धा आपल्याला माफ करणार नाहीत,आपले नाव घेणार नाहीत तेंव्हा सर्व समाज बांधव आणि इतरही आपले समाजबांधव यांनी एकत्र येऊन गुरू रविदास, छत्रपती शिवाजी महाराज शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारांची मशाल पेटवू या.याकरीता सर्व सुशिक्षित आणि शेतकरी, व्यावसायीक,नोकरवर्ग अशा सर्व समाज बंधू- भगीनींनी रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी "मनाली गार्डन वडाळा महादेव" या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता,श्री शिवाजीराव साळवे संस्थापक अध्यक्ष चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली होत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील चर्मकार समाजाच्या तालुकास्तरीय मेळाव्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहनही चर्मकार संघर्ष समिती श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष संजय लक्ष्मण दळवी,बाबासाहेब शिंदे,संतोष देवराय,जगन्नाथ तेलोरे,रविंद्र गाडेकर,अंबादास अभंग.राहुल कापसे,अर्जुन म्हैसमाळे,सुरेश भोसले,पत्रकार शौकतभाई शेख,तथा श्रीरामपूर शहर कार्यकारिणीचे शहराध्यक्ष कर्णासाहेब कापसे,सुभाष पोटे,कुणाल दळवी,सतिश शेंडे.,ज्ञानेश्वर केदार,बाळासाहेब चव्हाण,अशोक खैरे,भरत क्षिरसागर,अरविंद सोनवणे, विठ्ठल शेंडे,नामदेव नन्नवरे,प्रेमचंद वाघमारे,नामदेव कानडे. महिला कार्यकारिणी अध्यक्षा :सौ.इंदूताई नन्नवरे,सौ.सुरेखा केदार, सौ. मनिषा कानडे,सौ.संगीता क्षिरसागर,सौ.भाग्यश्री कापसे, सण सौ.भारती कांबळे,सौ.सुनंदा शेंडे, सौ.वैशाली पोटे,सौ/श्रीमती अंजना वाघचौरे, सौ. मोहिनी खैरे,सौ.सविता चव्हाण, सौ. सोनल वाघमारे,सौ.विजया कांबळे,सौ.स्नेहलता दळवी,सौ. मंगलताई सोनवणे सौ.आशा दळवी तथा संघर्ष समितीच्या सर्वच पदाधिकारी सभासदांनी केले आहे.

