shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती व संत श्री नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी (७३६वी)संयुक्त सोहळा संपन्न..!

राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:-
 दि.१९फेब्रुवारी शनिवार रोजी सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत नरहरी सोनार महाराज यांची ७३६वी पुण्यतिथी तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळ्याचे आयोजन नवी मुंबई सुवर्णकार समाजाच्या वतीने  फ्लोॅट नंबर १३६ बी, सेक्टर वन एस, शबरी हाँटेलजवळ नवीन पनवेल येथे समाजाच्या जागेवर आयोजित करण्यात आला होता.

 सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्योजक श्री राजेंद्रजी रघूनाथशेठ सोनार साहेब होते तर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री संजय गजाननशेठ खरोटे हे होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सचिव हेमकांत सोनार, कोषाध्यक्ष विजय भामरे, कार्याध्यक्ष प्रा. शांताराम सोनारसर उपस्थित होते .

       
सदर कार्यक्रमाची सुरुवात संत श्री नरहरी महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभा यात्रेने झाली.संत नरहरी महाराज यांच्या भूमिकेत कु. सारा तुषार भामरे ही शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण होते.यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "जय नरहरी" च्या जय घोषाने परिसर दुमदुमला होता.

      *प्रमुख पाहुणे तसेच मंडळाचे अध्यक्षांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज व सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री नरहरी सोनार महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ,व  पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून महाआरती करण्यात आली* . सर्व उपस्थित समाज बांधवांनी "जय भवानी" "जय शिवाजी", "श्री संत नरहरी महाराज की जय" चा सर्वानी एकत्रित नारा देऊन सर्व परीसरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले.  

यावेळी सर्वांनाचे चेहरे आनंदाने फुलून गेले. 
यावेळी समाज बंधूभगिनी बालगोपाल बहूसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे *प्रास्ताविक मंडळाचे सचिव हेमकांत सोनार* यांनी केले तर *मंडळाचे कोषाध्यक्ष श्री विजय जी भामरे साहेबांनी मंडळाचा अहवाल सादर केला.

यावेळी भाषणात प्रमुख पाहुणे *श्री राजेंद्र रघुनाथ शेठ सोनार साहेब म्हणाले की, समाजासाठी माझे योगदान नेहमी राहील तसेच समाजात युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना यासाठी माझे मार्गदर्शन नेहमी असेन, असे यावेळी सांगितले.
  .अध्यक्षीय भाषणात मंडळाचे अध्यक्ष *श्री संजय गजानन शेठ खरोटे म्हणाले की, आज संत नरहरी सोनार महाराज यांची ७३६वी पुण्यतिथी व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हा संयुक्त सोहळा निमित्ताने सर्व समाज बांधव आपल्या हक्काच्या जागेवर  एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.आजचा हा दिवस समाजासाठी सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाईल.तसेच या कार्यासाठी समाज बांधवांनी महत्वपूर्ण योगदान व सहकार्य केल्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानले.

 मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.शांताराम सोनार सर यांनी संत नरहरी सोनार महाराज यांच्या ७३६व्या पुण्यतिथी निमित्ताने महाराजांवर समाज प्रबोधन केले. ते स्वतः गीतकार असल्याने "धन्य धन्य हे संत शिरोमणी" लिखित अनिल जोजारे (औरंगाबाद)यांच्या आवाजात गायलेले गाणे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

युवा मंडळ अध्यक्ष श्री ऋषिकेश थोरात यांनी समाजातील युवकांनी काळची गरज ओळखून एकत्र येण्यासाठी आवाहन केले.महिला मंडळ सचिव सौ.कल्पना ताई सोनार(ऐरोली)यांनी कोविड- कोरोना काळात सुवर्णकार महिला मंडळाने राबविलेले उपक्रम,आँनलाईन मिटिंगच्या माध्यमातून महिला मंडळ एकत्रीकरण इ.वेगवेगळ्या उपक्रमाविषयीची  माहिती दिली .

या कार्यक्रमात समाज बांधव आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतच सेवेतून (२०२१-२२)सेवानिवृत्त झालेले आहे यामध्ये श्री श्रीनिवास पोतदार, श्री धोंडू शेठ विसपुते, श्री चंद्रकांत चव्हाण* तर नोकरी सेवेत पदोन्नती मिळालेले श्री तुषार भामरे,श्री पंकज पोतदार, कु.मानसी दुसाने , श्री ऋषिकेश पुंजाराम थोरात आदींचे *प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.समाजाचा कार्यात स्वतःला झोकुन देऊन विशेष उल्लेखनीय कामगीरी केल्या बद्दल अध्यक्षांच्या हस्ते श्री छोटुलाल दामोदर मोरे, कोषाध्यक्ष श्री विजय शामराव भामरे साहेब,सचिव श्री हेमकांत पुरूषोत्तम सोनार यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 सांस्कृतिक कार्यक्रमात *बाल कलाकार कु.शिवन्या अभिजित जडे, कु.स्वराली सोनार, कु.वैष्णवी वाघ, जेष्ठ कवी मंगलदास मोरे,श्री सोनार गुरुजी, डॉ. दिपाली विसपुते आदींनी संत नरहरी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे, गाणे,कवितावाचन,आरत्या इ.सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला.

    
मंडळाचे उपाध्यक्ष श्री पुंजाराम थोरात, डॉ.सतिष विसपुते,श्री प्रविण भामरे, जेष्ठ सभासद छोटूशेठ मोरे,सहसचिव श्री मनोज सोनार, प्रा.दिपक वाघ युवा अध्यक्ष श्री ऋषिकेश पुं.थोरात,यूवा उपाध्यक्ष अभिजित जडे, युवा सचिव तुषार भामरे मंडळाचे विधी सल्लागार अँड. शाम विसपुते,विभाग संपर्क प्रमुख श्री उदय विभांडिक, श्री महेंद्र चव्हाण, श्री दिनेश बाविस्कर, श्री श्रीनिवास पोतदार ,श्री संजय सोनार, श्री सुनील दुसाने, श्रीअशोक नेरकर,श्री रविंद्र सोनार, श्री विवेक पिंगळे, श्रीअनिल सोनार,राजेश विभांडीक,श्री राजेश सोनार,श्रीदत्तात्रय थोरात, डॉ. प्रमोद सोनार, श्री राजेंद्र पोतदार , आदी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच सुवर्णकार महिला मंडळातर्फे डॉ. दिपालीताई विसपुते, सौ.भारतीताई पोतदार, सौ.योगिता ताई भामरे,सौ.सुधाताई जडे,वैशाली सोनार ,श्रीमती मंगलाताई,सौ.आरती पोतदार सौ.अश्विनी सोनार आदी सुवर्णकार महिला भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

तसेच युवा मंडळाचे चंद्रकांत विसपुते,अक्षय भामरे, यश विसपुते, प्रविण सोनार, राहुल पोतदार, ललित सोनार,भुषण चव्हाण आदी युवकांचा उत्स्फूर्तपणे 
सहभाग होता. मंडळाचे संस्थापक सदस्यांपैकी श्री प्रकाश देवपुरकर, श्री गुलाब विसपुते, श्री नंदकुमार नाशिककर, श्री विजय भालेराव, श्री शरद आणि श्री किशोर वडनेरे भास्कर बापुराव भामरे  श्री अशोक विसपुते यांचे सुपुत्र श्री चंद्रकांत विसपुते, श्री रमेश भामरे आदी मंडळी आवर्जून उपस्थित होते. हा सोहळा पाहून सर्व समाजबांधव आनंदी झाले. समाजासाठी आमची नेहमी मदत राहील असे सर्वांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रम स्थळी नोंदणी कक्ष, पदवीधर मतदार नोंदणी कक्ष, भोजन व्यवस्था, सँनिटायझर इ.आयोजन करण्यात आले होते. तुषार भामरे यांनी फोटोग्राफी तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शमीका सोनार यांनी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करणे साठी सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे सहकार्य केले त्यांचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

या यशस्वी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री छोटूलाल मोरें व नवी मुंबई सुवर्णकार कार्यकारणी मंडळ यांनी केले.तर सुत्रसंचालन सौ.अनिताताई उदय विभांडिक कु.मानसी दुसाने यांनी केले .या कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे आभार प्रा.शांताराम सोनारसर (पाली, श्रीक्षेत्र गणपतीचे)यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
close