shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलिसांनी आठ दिवसात कामकाजात सुधारणा करावी अन्यथा तीव्र आंदोलन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ 

पोलिसांनी आठ दिवसात कामकाजात सुधारणा करावी अन्यथा तीव्र आंदोलन..!!
 
पाथर्डी : तालुक्यासह शहरात दिवसा होणा-या चो-या, मंगळसुत्रचोर, मोटारसायकल व मोबाईल चोर व मटका, झुगार व दारु या अवैध व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिसांवर सामान्य नागरीकांचा विश्वास उडाला आहे. महिला व पुरुष आणि पैसा सुरक्षित राहीला नाही. त्यामुळे पोलिसांनी आठ दिवसात तातडीने कारवाई करून चो-यांचा तपास लावावा.अवैध व्यवसाय बंद करावेत अन्यथा भाजपाच्या वतीने पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र अंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला आहे. 

याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन देऊन शहर व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी,कायदा सुव्यवस्था, अवैध धंदे याबाबत माहिती घेऊन पोलिसांना जाब विचारत व कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून तत्काळ सुधारणा करा असा इशारा दिला.यावेळी सभापती सुनिता दौंड,भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, शहराध्यक्ष अजय भंडारी, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, पंचायत समीती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनिल ओव्हळ, सुभाष केेकाण, नगरसेवक प्रवीण राजगुरू, अनिल बोरूडे, रमेश गोरे, बजरंग घोडके, रमेश हंडाळ, बबन बुचकुल, 'मंगल कोकाटे,खरवंडी कासारचे सरपंच प्रदिप अंदुरे, संदीप पठाडे, सिंधुताई साठे, ज्योती मंत्री, मनिषा घुले, अॅड. प्रतिक खेडकर, भगवान साठे,अॅड.संपत गर्जे, भगवान साठे,काकासाहेब शिंदे,उत्तम गर्जे, पांडुरंग सोनटक्के, राजेंद्र दगडखैर,अक्षय काळे,अशोक मंत्री, युसुफ शेख, बाळासाहेब गोल्हार, नवनाथ नरोटे, जमीर आतार, नारायण पालवे, आदिनाथ धायतडक, नवनाथ धायतडक, गोरक्षनाथ धायतडक, महेश अंगारखे, संदिप पवार माणिक अंदुरे, भाऊसाहेब सांगळे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांची भेट घेतली. 
शहरातील सध्याच्या चोरी प्रकरणाने जनता त्रस्त झाली आहे.ग्रामिण भागात दिवसा चो-या होत आहेत.लाखो रुपयाची लुट होते.तपास लागत नाही.पोलिसांच्या बद्दल सामान्य माणसाच्या मनातला विश्वास डळमळीत झाला आहे. 

लोकभावना तीव्र आहेत.भरदिवसा महिलांचे दागिने लुटले जात आहेत. मोबाईल व दुचाकीच्या चो-या दररोज होत आहेत. बाजारात खिसे कापले जातात. दारु, मटका, मावा व झुगारासह अवैध व्यवसाय तेजीत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला त्रास होतो. 

तातडीने उपाययोजना करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे अंदोलन करण्याचा इशारा आमदार राजळे यांनी दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसां विरोधात तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटावा अशी कारवाई करावी लागेल. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही.

चो-यांचा तपास लागला पाहीजे अन्यथा भाजपा रसत्यावर उतरुन तीव्र अंदोलन करील असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी बोलतांना स.पो.निरीक्षक रामेश्वर कायंदे म्हणाले तुमच्या भावना रास्त आहेत.पोलीस बळ अपुरे आहे. तालुक्याचा विस्तार मोठा आहे.

पुर्वीच्या गुन्ह्याची निर्गती करताना दमठाक झाली आहे.चो-यांच्या प्रकाराबाबत आम्ही गांभीर्याने तपास करीत आहोत. लवकरच चोरटे जेरंबद करु. शहरात पोलिस गस्त वाढवुन योग्य ती कारवाई केली जाईल.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close