shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुक्यातील गरीब माणूस ही माझी ताकद - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

तालुक्यातील गरीब माणूस ही माझी ताकद - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

राज्याला उद्धव ठाकरेंच्या रूपाने चांगला मुख्यमंत्री मिळाला - राज्यमंत्री भरणे यांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक. 

इंदापूर प्रतिनिधी:काम करताना नेहमी सत्याची कास धरून गरीब माणसाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न केला.म्हणूनचं या तालुक्यातील गरीब माणूस ही माझी ताकद आहे. असे उद्गार निरवांगी येथील जाहीर सभेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांना संबोधित करताना काढले.

दि.१७ फेब्रुवारी रोजी इंदापूर तालुक्यातील मौजे. निरवांगी, दगडवाडी, पिटकेश्वर या गावातील ३० कोटी ८० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी निरवांगी येथील
जाहीर सभेत बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,
देशाचे नेते शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला २०१२ साली पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले.कोणतेही पद हे मिरवण्यासाठी किंवा रुबाब करण्यासाठी नसते.मला दिलेल्या संधीचा उपयोग मी सामान्य माणसांसाठी गोरगरीब जनतेसाठी करत आहे.त्यांना समोर ठेऊनचं तालुक्यात विकासाची गंगा वाहते आहे
गोरगरीब जनतेच्या विकासाला प्राधान्य देण्याची शिकवण आम्हाला देशाचे नेते शरद पवार यांनी घालून दिली आहे. म्हणूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम करताना कधीही जातीचा-पातीचा,लांबचा-दूरचा, पक्षाचा असा भेदभाव केला नाही. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचे काम काय आहे आणि त्याला आपण मदत कशी करू यासाठी मी प्राधान्य दिले.जनतेने सांगितलेली सर्वच कामे झाली असं म्हणणार नाही मात्र जे काम होईल ते मी होईलचं म्हणतो जे होणार नाही ते नाहीच म्हणतो.काम करताना कधी कोणाला खोटे आश्वसन दिले नाही ना तालुक्यातील कोणाची फसवणूक केली.काम करताना नेहमी सत्याची कास धरून गरीब माणसाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न केला.म्हणूनचं या तालुक्यातील गरीब माणूस ही माझी ताकद आहे.

सामान्य गोरगरीब माणसाला कशी मदत करता येईल. अल्पसंख्याक माणसाला कशी मदत करता येईल. माझ्या मागासवर्गीय लोकांना कशी मदत करता येईल. सर्व सामान्य माणसाच्या घरात कसे पाणी मिळेल, यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने प्रामाणिक काम केल आहे.
इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी कधीच निधी कमी पडू दिला नाही आणि देणार ही नाही.मी प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांकडून इंदापूरसाठी कोटीत निधी मंजूर करून आणत आहे.

 



 राज्याला उद्धव ठाकरेंच्या रूपाने चांगला मुख्यमंत्री मिळाला... राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक.

मागील काही दिवसापूर्वी इंदापूरच्या कार्यक्रमात भरणे यांच्याकडून चुकून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख झाला होता...त्यावरून ते इंदापूर मध्ये ट्रोल झाले होते परंतु त्यांनी निरवांगी सभेत त्यांनी जाहीर पणे सांगितले की,महाराष्ट्र राज्याला उध्दव ठाकरेंच्या रूपाने सर्वात चांगला मुख्यमंत्री मिळाला आहे.

यावेळी प्रताप पाटील, अभिजीत तंबिले, प्रशांत पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ,अतुल झगडे, नवनाथ रुपनवर,
सागर मिसाळ, अभिजीत रनवरे,ॲड.शुभम निंबाळकर, दत्तात्रय घोगरे, सतीश पांढरे, छायाताई पडसळकर,  सचिन खामगळ, अजिनाथ कांबळे,विठ्ठल पवार, समाधान पोळ उपस्थित होते.
close