राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी व जुनिअर कॉलेज येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
१८ फेब्रु हा दिवस शाळेचा नामकरण दिवस असून शाळेचे नाव श्रीमान शेठ भारत दोशी यांच्या स्मरणार्थ भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी असे केले - अध्यक्ष आशिष केसकर .
इंदापूर प्रतिनिधी: , १८ फेब्रु. २०२२. रोजी भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी व जुनिअर कॉलेज येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात आपले मनोगतामध्ये दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेतील आठवणी , मनातील सुप्त इच्छा व ध्येय , त्यांना प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न छत्रपती कारखान्याच्या संचालक पदापासून ते महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीपदापर्यंतच्या वाटचालीचा व संघर्षाचा धावता आढावा घेत “विद्यार्थ्यांना मनातील इच्छा व लक्ष्य प्राप्त करण्याची जिद्द व अथक प्रयत्न असतील तर ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही” अशी प्रेरणा दिली. याच बरोबर शाळा व्यवस्थापन, प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलांचा सर्वांगीण विकास व निरंतर शिक्षणासाठी कोरोना काळात केलेल्या प्रयत्नाचे विशेष कौतुक केले.शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव सर्वदूर पोहोचवून सर्व क्षेत्रात उंचावलेले असल्याने उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेउन ते अधिकाधिक उंचावण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची तर विशेष अतिथी म्हणून प्रतापराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच धीरज केसकर वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड चे क्लस्टर हेड हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आशिष केसकर (अध्यक्ष , बी सी ए) व पांडुरंग कवडे (उपाध्यक्ष, बी सी ए) मंचावर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनने झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी प्रमुख पाहुण्या’च्या कार्य कतृत्वाची उपस्थित विद्यार्थी व पालकांना ओळख करून देत शाळेच्या प्रगतीच्या चढत्या आलेखाविषयी माहिती सांगितली .
अध्यक्षीय भाषणामध्ये आशिष केसकर यांनी प्रमुख पाहुण्यांनी दिलेली वेळ व मार्गदर्शना बाबत आभार मानत आजचा १८ फेब्रु हा दिवस शाळेचा नामकरण दिवस असून शाळेचे नाव श्रीमान शेठ भारत दोशी यांच्या स्मरणार्थ भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी असे केल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी मान्यवर अतिथी धीरज केसकर यांनी दत्तात्रय भरणे यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड व वालचंदनगरच्या अडीअडचणी सोडविण्यापासून ते विकास कामामध्ये दिलेल्या भरघोस सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये इ. १० वी व १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे व महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे पारितोषिक देउन अभिनंदन करण्यात आले.
बी सी ए शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणेतर क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असल्याचे राज्यस्तरीय वक्र्त्व स्पर्धा , राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा, राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा तसेच राष्ट्रीय स्तरावरील निबंधलेखन स्पर्धा व बॉक्सिंग स्पर्धांमधील यशप्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी कु. प्रतीक्षा सुनील पाटील हिच्या गिनीज वर्ल्ड रेकार्ड साठी केलेल्या यशस्वी प्रयत्नाबद्दल उपस्थित मान्यवरांनी विशेष प्रशंसा करून सन्मानित केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार सौ स्वाती रणमोडे व सौ अमृता कोळेकर यांनी केले. तसेच शाळेचे पर्यंवेक्षक श्री अमोल गोडसे, श्रीमती प्रेमा सिंह , सौ प्राचना माळशिकारे, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अथक प्रयत्न केले .

