shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवजयंतीनिमित्त काँग्रेस वाटणार "शिवाजी कोण होता ?" पुस्तकाच्या पाच हजार प्रती


किरण काळे युथ फाउंडेशनच्या सौजन्याने  काँग्रेसचा आगळा-वेगळा उपक्रम

 प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर :१८ /   शिवप्रेमींचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी लिहिलेल्या "शिवाजी कोण होता ?" या महाराजांवरील पुस्तकाच्या पाच हजार प्रती वाटण्यात येणार असल्याची माहिती, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमावलीमुळे मिरवणूक काढण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळ्यामध्ये तरुण पिढीला चुकीचा संदेश जाईल अशा पद्धतीने ती साजरी न करता तरुणांना शिवचरित्रातून योग्य दिशा मिळावी यासाठी किरण काळे यांच्या संकल्पनेतून शिवचरित्र वाटपाची शहरात मोहीम राबवली जाणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. 

क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी म्हटले आहे की, किरण काळे युथ फाउंडेशनच्या सौजन्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने हा उपक्रम शिवजयंती निमित्त राबवण्यात येणारा असून शहरातील युवक, युवती व शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराजांच्या विचारांची प्रेरणा आजच्या व भावी तरुण पिढीला मिळावी यासाठी काँग्रेसच्या वतीने हा पुढाकार घेण्यात आला आहे. 

शिवजयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करून माळीवाडा बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर महाराजांवरील पुस्तकाच्या वितरण मोहिमेचा काळे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, एनएसयूआय प्रभारी अनिस चुडीवाला, शहर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विरेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे.
close