ज्येष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे यांचे निधन
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे यांचे वयाच्या (७९ ) व्या वर्षी बावडा येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने दि ३ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी बेधडक
पणे अनेक विषयांवर विपूल लिखाण केले होते
ते उत्तम व्यंगचित्रकारही होते जोशी अभ्यंकर हत्यकांड निकालावेळी रमांकांत तोरणे यांनी एका वृत्तपत्रात “ फाशीची शिक्षा असावी की नसावी ?, फाशीची शिक्षा म्हणजे सूड नव्हे ” या विषावर एक विशेष लेख लिहला होता या लेखाचे तत्कालीन मुख्य न्यायाधिश चंद्रचूड यांनी कौतुक करून निकालावेळी या लेखाचा संदर्भ दिला होता
या लेखाचे संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले होते यांनतर न्या चंद्रचूड यांनी त्यांना पत्र पाठवून या लेखाचे कौतुक केले होते रमाकांत तोरणे यांच्या मृत्यू पश्चात दोन विवाहित मुले ,पाच विवाहित मुली सूना , नातवंडे असा परिवार आहे

