shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वक्फ बोर्डाच्या कार्यालयातुन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी डोक्यावर तबक घेऊन काढला मानाचा संदल...!

महान सुफी संत राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांची परभणी येथील दर्गाह सर्व धर्म समभावाचे, एकात्मतेचे प्रतिक असून सर्व जिल्हा वासियांची हे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात दर्गाच्या ठिकाणी होणाऱ्या उर्साला याहीवर्षी कोव्हिड-19 च्या संसर्गामुळे परवानगी देण्यात आली नाही पण हजरत सय्यद शहा तुराबूल हक्क साहेब यांच्या उर्स निमित्त दर्गा येथे जे धार्मिक याआणि पारंपारिक अत्यावश्यक कार्यक्रम आहेत ते मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.

आज मंगळवार 1 फेब्रुवारी  रोजी परभणी जिल्हा वक्फ कार्यालयात हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब  यांच्या उर्सानिमित्त संदलला सुरुवात करण्यात आली. मानाचा संदलचा तबक परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी डोक्यावर घेवून जिल्ह्यातील जनतेच्या निरोगी आरोग्यबद्दल प्रार्थना केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसिलदार डॉ.संजय बिरादार , उपजिल्हाधिकारी राजेश काटकर , जाकेर लाला,तहेसीन खान,अली खान, हमीद मलिक,वक्फ बोर्डाचे सर्व अधिकारि उपस्थित होते.

close