shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लुधियाना-नांदेड दर्शन यात्रेचे पूर्णा,औरंगाबाद रेल्वे स्थानकावर स्वागत..!

पूर्णा । प्रतिनिधी :-
लुधियाना येथून आलेल्या हुजूर साहिब दर्शन यात्रेचे पूर्णा तसेच औरंगाबाद रेल्वे स्टेशन वर भारी स्वागत करण्यात आले. 

पंजाब मधील लुधियाना येथून हि यात्रा 2 फेब्रुवारी ला सचखंड एक्सप्रेस ने निघाली होती, काल मनमाड मार्गे औरंगाबाद पूर्णा येथून नांदेड ला रवाना झाली, दरम्यान या यात्रेचे रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यात्रेत 110 जण सहभागी झालेले आहेत. पूर्णा रेल्वे स्टेशनवर पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सय्यद कलीम भाई यांनी लुधियाना यात्रेचे स्वागत केले,

यात्रेचे मुख्य संयोजक तथा श्री हुजूर साहिब सेवक जथा चे अध्यक्ष सरदार कुलदीप सिंघ दीपा यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. दरम्यान औरंगाबाद येथे नानक साई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चरण सिंग पवार व त्यांच्या सहकारी मित्रांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रा नांदेड येथे पोहचल्यानंतर नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, तुकाराम कोटूरवार,दत्ता कुलकर्णी, जयप्रकाश नागला यांनी यात्रेचे पुष्पवृष्टी ने स्वागत केले. 10 फेब्रुवारी पर्यंत सचखंड गुरुद्वारा सहित विविध धार्मिक स्थळांचे दर्शन करून यात्रा लुधियाना कडे रवाना होणार असल्याचे सरदार कुलदीप सिंघ दीपा यांनी सांगितले.
close