shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पालकांची धाव का आहे खासगी शाळांकडे ?


याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि दुसरे म्हणजे निष्क्रिय शिक्षक 
...............................................
चांगली पीढी ही देशाचं भवितव्य आहे असं म्हणतात , पण पीढी घडविणारा कारखानाच जीथे डबघाईस आला असेल तिथे मात्र सर्व संपलं.

कुणालाही लाज वाटेल अशी शिक्षण व्यवस्था मी गेली तीन महिने बघतो आहे, मी कुणी शिक्षणाधिकारी नव्हे मी एक सामान्य संगीत शिक्षक आहे, जो आपली स्थापीत नोकरी सोडून विदर्भातील शाळा शाळांमध्ये फीरुन  " संगीत संस्कार " या नावाने एक व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम करित आहे, 
जवळपास प्रत्येक शाळांची एक भव्य इमारत, भव्य मैदान, अग्रगणी एक ऐतिहासिक वाटेल असा मुख्य फलक,पण आत मध्ये प्रवेश करताच अगदी शुकशुकाट जणू या शाळांमध्ये सध्या कुणीच उपलब्ध नाही, 
आत शिरताच एक कार्यालय जीथे मुख्याध्यापक बसलेले आहेत.

एखादा प्राचीण काळची खुर्ची आणि मळलेला टेबल क्लाॅथ ठेवलेला जुना टेबल, आजुबाजुला भक्कम भींतीला लागलेले जाळे, धुळ माती विद्यार्थी वर्गात आहेत, आणि बहुतेक शाळांमध्ये शिक्षक काहीतरी लेखी काम करताहे.
अचानक मी एक नवीन कार्यक्रम सादर करण्यासाठी पुर्व सुचना देण्यासाठी गेलेला पाहुणा म्हणजे नागपुरातील एका नामवंत शाळेचा संगीत शिक्षक..
मुख्याध्यापकांसहीत बहुतेक शिक्षकांचे  चेहरे अगदी धास्तावलेले, 
जणु काही संकट आलं आहे.

अगडबंब पगागाराचे एम,ए, डि एड, बि.एड त्यांचे कपडे, त्यांची अर्धवट पीकलेली दाढी, बोलण्यातील रांगडा स्वर, माणुसकी बेपत्ता असलेलं वर्तन 
तोंडात गुटखा, आणि भावहीन असलेले चेहरे बघुन शिक्षण व्यवस्थेचा राग येवू लागतो..या सर्व शाळा अनुदानित विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त, एखाद्या धोतर आणि गांधी टोपी घातलेल्या संस्थापकाची भींतीवरील प्रतीमा बघीतल्यावर तेथील वर्तमान शिक्षकाची दया येवू लागते आणि रागही येतो.

अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी लाखो रू लाच देणारे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार ? 
ज्या शाळेत जावं तीथे ते विद्येचं पवित्र मंदिर आहे हे जाणवतच नाही.

मग का पालक अशा शाळांमध्ये मुलांना पाठवतील, 
आपसात वर्गनी करून शाळेची रंगरंगोटी करून नोकरी टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी स्वतः ल अपडेट केलं तर देशाचं भवितव्य उज्ज्वल होईल.

तुमच्या शाळेत प्रवेश केल्यावर का असा नकारात्मक फील येतो, ही जाणीव असली पाहिजे..
अतिशय दयनीय असलेली गावागातील शाळांची परिस्थिती अगदी विदारक आहे.

राज्यातील जनप्रतिनिधींना या अवस्थेची ज्या दिवशी लाज वाटेल, तो दिवस या देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा पहीला दिवस असेल..
.....
रिनेश रंजन
🙏
close