Date: 15 Feb 2022
बघतच रहावे वाटे,
पालवीने कोवळ्या नटलेल्या झाडाला,
नाहीच इतुकी टंचाई,
घालावे पाणी पुरेसे लावलेल्या झाडाला,
कृपावंत ठरतात ना,
जपावे मनापासून पावलेल्या झाडाला,
पडतात आजारी बिचारी,
मिळतील का उपचार खुंटलेल्या झाडाला,
देतच राहतात बघा ना,
गोंजारावे फळांनी लगडलेल्या झाडाला,
लावा जीव जिवंतपणी,
कुर्हाडीचे नसे भय वठलेल्या झाडाला,
जगत रहावा जीव हर एक,
वहावी श्रद्धांजली तोडलेल्या झाडाला !
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
रचना: दीपक महाले, शिरूर कासार...!
मो. 9823384909

