शहरातील विविध नागरी समस्यांबाबत
राजद'चे पालिका प्रशासनाला निवेदन..!
श्रीरामपूर ( प्रतिनिधी) :- सध्या श्रीरामपूर शहरात नागरी सुविधांचा मोठा अभाव असून, विविध प्रश्न प्रलंबित आहेत. घरपट्टी माफी,साठवण तलावाची सुरक्षाव्यवस्था,पंतप्रधान आवास योजनेचे थकीत हप्ते व अंतिम यादी मंजुरी, महापुरुषांचे पुतळे, पाणी, रस्ते आदी अनेक प्रश्न त्वरित मार्गी लावावे अशी मागणी 'राष्ट्रीय जनता दला'च्या वतीने नगर पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदरील मागण्यांचे निवेदन श्रीरामपूर न.पा. मुख्याधिकऱ्यांच्यावतीने पालिकेचे अधिकारी दीपक मारशिया यांनी स्विकारले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील विविध नागरी समस्या या लवकरात-लवकर सोडवून मार्गी न लावल्यास 'राजद'च्यावतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी 'राजद'चे जिल्हाध्यक्ष इम्रानभाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष योगेश गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष हरीश शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश बोरुडे, राहुल क्षीरसागर, सुनील इंगळे, अंकुश पवार, विजय कावरे आदींनीच्या या निवेदनावर स्वक्षऱ्या आहेत.
तसेच या निवेदनात शहरातील विविध नागरी समस्या सोडविण्याची मागणीही करण्यात आली आहे.त्यात कोरोना काळातील घरपट्टी माफ करावी, साठवण तलावाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, शहरात स्वच्छ व जास्त दाबाने पाणी पुरवठा करावा,शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला असल्याने शहर स्वच्छ ठेवण्याबाबात ठेकेदाराला नोटीस बजवावी,छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा,भारतरत्न मौलाना आझाद पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता सावित्रीबाई फुले,भारतरत्न संत मदर तेरेसा पुतळा, प्रधानमंत्री आवाज योजनेचे थकीत हप्ते व अंतिम यादी मंजुरी व रमाई घरकुलाचे हप्ते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे नूतनीकरण, संत गाडगेबाबा उद्यानातील खेळणी साहित्त्य दुरुस्ती, लॉन,वृक्ष लागवडी करून सुशोभीकरण करणे, गोंधवणी रस्त्यावरील खड्डे बाजूवून ठेकेदाराला दंड करावा आदी मागण्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

