रविवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२२
ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले....सोडिले सर्व घरदार, त्यागीला सुखी संसार.....ज्योतीसम जीवन जगले, ते देशासाठी लढले , ते देशासाठी जगले....
राहुरी (खडांबे खुर्द) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमिित्त काल शनिवार ता. १२ रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला. जि.प.प्राथ.शाळा खडांबे खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सैन्य दलात असताना आलेले अनुभव अगदी ओघवत्या शब्दात मांडले. अनेक लढायांचे प्रत्यक्ष चित्र उभे केले. विद्यार्थी आणि शिक्षकांना रोमांचक आणि थरारक युद्ध प्रसंग ऐकताना अंगावर शहारे आणणारे प्रसंग विर रसातून ऐकताना भान हरपून गेले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या परिसरातील माजी सैनिकांचा परिचय मुलांना व्हावा . त्यातून देश सेवेचे स्फुलिंग वृध्दींगत व्हावे. भारतीय स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास आणि स्वातंत्र्यानंतर प्राणाची बाजी लाऊन देशसेवेाठी अविरत झटणाऱ्या सैनिकांच्या कार्याची दखल घेऊन , त्यांच्याप्रती असणारा अभिमान जागृत व्हावा . आणि मुलांना आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा मिळावी हा उद्देश समोर ठेऊन या नेटक्या व सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मान्यवरांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मेजर श्री नितीन हनुमंता कल्हापुरे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रभाकर हरिश्चंद्रे, उपसरपंच श्री संजय कल्हापुरे, गणेश पारेे, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
देशसेवेसाठी अविरत झटणाऱ्या या माझ्या विरपुत्रांनी सर्व मुलांसाठी खाऊ वाटप केला .आपण आम्हाला आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल पुनश्च आभार मानले.
या प्रसंगी माजी सैनिक मेजर श्री नितीन हनुमंता कल्हापुरे , मेजर श्री. प्रदिप शिवाजी पवार व मेजर श्री. देवीदास बाबुराव कल्हापुरे उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी केले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

