शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२२
नाशिक-सुरत 176 किमीचे अंतर अवघ्या 75 मिनिटांत गाठणे शक्य..!!
नाशिकहून आता सुरत ५ तासात नाही सव्वा तासात बाय रोड -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन-फिल्ड महामार्गाची घोषणी केलीय. यामुळे नाशिक-सुरत हे 176 किलोमीटरचे अंतर आता फक्त सव्वा तासात म्हणजेच अवघ्या 75 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.
यामुळे दोन्ही शहरांच्या उद्योग, व्यापार, शेती क्षेत्राला फायदा हाेणार आहे.
ग्रीन-फिल्ड महामार्गाच्या कामाला मार्च 2023 मध्ये सुरुवात होणार आह. त्यात चेन्नई-सुरत हा सहा पदरी ग्रीनफिल्ड उभारण्यात येणार आहे. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे नाशिक आणि सुरतचे अंतर कमी होणारय. विशेष म्हणजे येणाऱ्या चार वर्षांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जातेय. हा महामार्गा पूर्ण झाल्यानंतर नाशिकचे महत्त्व वाढणार आहेच. सोबतच नाशिकचा भाजीपाला थेट दाक्षिणात्या राज्यातही जाईल. माल थेट बंदरात पोहचविता असल्याने इतर खर्च कमी होईल. शिवाय नाशिक पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची त्यामुळे मोठी सोय होणारय. स्वतः गडकरींनी ही माहिती दिलीय...
काय म्हणाले नितीन गडकरी-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाकडून पहिला कार्यक्षम खासदार पुरस्कार दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना गडकरी यांनी या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. नव्या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे 1600 किलोमीटरचे अंतर 1270 किलोमीटवर येईल. त्यामुळे 350 किमीचा प्रवास कमी करावा लागेल. मोठ्या शहरातील प्रदूषण यामुळे कमी होईल. मुंबई, पुणे, सोलापूर येथील वाहतूक 50 टक्के घटेल. सध्या नाशिक ते सुरत दोन मार्गाने जाता येते. पहिला मार्ग नाशिक-दिंडो-सापुतारा. हे अंतर 240 किलोमीटर आहे. तर नाशिक-धरमपूर-सुरत हे अंतर 225 किमी आहे. सध्या या प्रवासासाठी पाच तासांचा वेळ लागतो.
नाशिकहून आता सुरत ५ तासात नाही सव्वा तासात बाय रोड -
चेन्नई-सुरत हा ग्रीन फील्ड सहापदरी महामार्ग..
# केंद्र सरकारच्या ग्रीन फील्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरत हा ग्रीन फील्ड सहापदरी महामार्ग उभारला जाणार असून तीन महिन्यांत त्याचे काम सुरू होणार आहे.
हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याने नाशिक ते सुरतदरम्यानचे अंतर अवघे १७६ किमीवर येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या सव्वा तासात सुरत शहर गाठता येणार असल्याची घाेषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
सध्याचे मार्ग -
सध्या नाशिक-धरमपुर-सुरत या मार्गाचे अंतर २२५ किमी आहे. दुसरा २४० किमीचा मार्ग नाशिक-दिंडाेरी-सापुतारा मार्गे सुरत असा आहे. या दाेन्ही मार्गांनी सुरतला पाेहाेचण्यासाठी किमान ५ तास लागतात. त्याची आता बचत होईल.
११,००० काेटींचा खर्च -
सुरत ते चेन्नई हे १,६०० किमीचे अंतर १,२५० किमीवर येईल. मुंबई, पुणे, साेलापूर या शहरांच्या वाहतुकीचा बोजा निम्याने घटेल.
यंदा मार्चमध्ये निविदा काढून मार्च २०२३ मध्ये काम सुरू हाेऊन पुढील अडीच वर्षांत पूर्ण हाेईल.
नाशिक जिल्ह्यामार्गे दरराेज सुरतकडे सुमारे ४६,००० वाहने जातात. जिल्ह्यात १२२ किलोमीटरच्या या महामार्गासाठी ११,००० काेटी रुपये खर्च येईल.
फायदा-
रस्त्याच्या बाजूला, लाॅजिस्टिक-रिसर्च सेंटर्स, गाेडाऊन्स, उद्याेग, अन्न प्रक्रिया उद्याेग, काेल्डस्टाेअर उभे राहतील. दक्षिणेतही भाजीपाला पाेहाेचवता येईल. सूरतमधील भाविकांना शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी जाण्यासाठी मोठी साेय होईल.
कोणत्या तालुक्यातून जाणार?
नाशिक तालुक्यातील आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव येथून हा मार्ग जाईल. निफाड तालुक्यातील चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी गावातून हा महामार्ग जाईल. सुरगाणा तालुक्यातील बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ गावातून हा मार्ग जाईल.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

