शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२२
अण्णा हजारे उपोषण करणार की नाही? आज होणार फैसला..!!
अहमदनगर (पारनेर) : राज्य सरकारने नुकताच सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. तसेच त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. अखेर १४ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला होता.
किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अण्णांची मनधरणी सुरु आहे.
यामुळे आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय आज रविवारी रोजी घेणार असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या
या निर्णयाचा विरोधात अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी राळेगण येथे धाव घेत त्यांनी अण्णांशी चर्चा केली.
या चर्चेनंतर आपलं 50 टक्के समाधान झाले, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. उपोषणासंबंधी रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान सिंग यांनी हजारे यांच्याशी चर्चा करताना उपोषण टाळण्याची विनंती केली आहे. नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील या चर्चेवेळी उपस्थित होते.
अण्णा हजारेंची पोलिस महानिरीक्षकांनी घेतली भेट..!!
"अण्णा हजारे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी हजारे यांची काल दुपारी एक वाजेच्या सुमारास भेट घेऊन उपोषण करू नये अशी विनंती केली. या उभयतांमध्ये बंद दाराआड सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली होती."
किराणा दुकानात वाईन विक्री करण्यापूवी त्यावर जनतेकडून हरकती, त्यांचे अभिप्राय मागवण्यात येणार आहेत. तसेच ग्रामसभेच्या परवागनीनंतरच हा निर्णय अंतिम करण्यात येणार आहे.
वाईन विक्रीचा निर्णय वेगवेगळ्या टप्प्यावर पडताळून पाहिल्यावर अंतिम होणार असल्याने हजारे यांनी उपोषणाची घाई करू नयेत, अशी विनंती केल्यानंतर अण्णांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

