shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी कृषी उद्योग पिंप्री निर्मळ आणि के बी बायो ऑरगॅनिक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्री निर्मळ येथे पीक चर्चा सत्राचे आयोजन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२

शेतकरी कृषी उद्योग पिंप्री निर्मळ आणि के बी बायो ऑरगॅनिक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्री निर्मळ येथे पीक चर्चा सत्राचे आयोजन..!!

राहता : आज ता. 23 रोजी सकाळी 9 वाजता शेतकरी कृषी उद्योग पिंप्री निर्मळ आणि के बी बायो ऑरगॅनिक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्री निर्मळ येथे पीक चर्चा सत्र आयोजन करण्यात आले.
     या कार्यक्रमची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सदर चर्चासत्राकरिता पिंप्री गावातील कृषी सहायक तसेच सेवा निवृत्त कृषी अधिकारी या शिवाय पंचक्रोशीतील 160 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते . 
अतिशय तंत्रशुद्ध माहिती देऊन शेतकरी बंधूंचे मन जिंकण्यात आले यावेळी डाळिंब आणि कांदा पीक तसेच आपल्या प्रोडक्ट बद्दल मा डॉ शुभांगी नारकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
तसेच कंपनी विषयी मा श्री प्रताप पवार सर यांनी महिती दिली , विषमुक्त शेती बद्दल शेतकरी बांधवात जनजागृती मा श्री बालाजी कांबळे सर यांनी केली. कार्यक्रम वेळी ऑरगानीम , पी एच टूनर , बॅलन्स स्टिक याचे डेमो शेतकऱ्यांना दाखवून आणि त्यांच्या शंका चे निरसन देखिल करण्यात आले.
       या प्रसंगी श्री सतीश सोनवणे सर स्वप्नील तांबे आणि आदित्य ढोकचौळे यांनी खूप कष्ट घेतले . कार्यक्रम च्या शेवटी शेतकरी बंधूंना उत्कृष्ट अशी माहिती शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल ग्रामस्थांनी मा. शुभांगी मॅडम यांचा जाहीर नागरी सत्कार केला तसेच उत्कृष्ट नियोजन केले याबद्दल मा श्री सतीश सर आणि स्वप्नील सर यांचा देखिल जाहीर सत्कार केला तर आभार गावकरी मंडळींनी मांडले. सदर चर्चा सत्राचे सूत्रसंचालन मा. श्री वर्पे सर यांनी केले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close