प्रतिनिधी : आकाश लोणकर
भेंडा : २४ / नेवासा तालुक्यातील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता पब्लिक स्कूल भेंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी या शिवजयंती निमीत्त विविध देखावे सादर केले त्यामधे शिव जन्म सोहळा, अफजल खानाचा वध, शिवाजी महाराजांचा पोवाडा, महाराजांचे शिक्षण, शिव गर्जना इत्यादी कार्यक्रम झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य - सोमनाथऔताडे होते . तसेच उपप्राचार्य दीपक राऊत, रमेश पाडाळे, कारभारी गरड, संतोष सोनवणे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षककेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुयोग शिरसिम यांनी केले तसेच आभार सौ .सारिका कपोते यांनी मानले.

