shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ..हो..साहेब...आमच्यांच अंगणवाड्यांत कोरोना आला का ?..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२

आ..हो..साहेब...आमच्यांच अंगणवाड्यांत कोरोना आला का ?..!!
◾कोरोनामुळे अद्यापही अंगणवाड्यांचे दार बंदच

पैठण : चिमुकल्या पावलांना शिक्षणाकडे वळवून अक्षर ओळख करण्यासाठी अंगणवाड्या मोलाची भूमिका पार पाडतात. मात्र कोरोनामुळे अंगणवाड्या बंद करण्यात आल्याने चिमुकल्यांची बौद्धिक विकासाची प्रक्रिया खुंटली आहे.
पैठण तालुक्यात शेतीवर अवलंबून असलेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा मोठा अभाव दिसून येतो. आई-वडील अशिक्षित असल्यामुळे झाला आहे. त्यांचे मुलांच्या शिक्षणाकडेही फारसे लक्ष नसते. अशावेळी अंगणवाडी केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरते. अंगणवाडी अंतर्गत चिमुकल्यांना पोषण आहारासह योग्य शिक्षण सुद्धा दिले जाते. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्या बालकांकरिता बंद आहेत.

त्यामुळे चिमुकल्यांच्या शिक्षणाचा मार्गच बंद झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचाच परिणामी बालकांच्या बौद्धिक विकासाचा मोठा प्रश्न निर्माण कोरोना महामारीने मोठ्यांसोबतच लहान मुलांचे शिक्षण प्रभावित केले आहे. त्यामुळे कोवळ्या मनावरही परिणाम पडत आहे. आधी अभ्यासात हुशार असलेली व आई वडिलांचे म्हणणे ऐकणारी मुले आज हेटळवाणे बोलतात. असा दुरोगामी परिणाम त्यांच्या मनावर दिसत आहे. शासनाने लवकरात लवकर अंगणवाड्या सुरू कराव्या अशी मागणी पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.

"इंग्लिश स्कूल सुरु झालेत, शाळा सुरु झाल्यात मग आमच्या मुलांच्या अंगणवाड्या का बंद ठेवत आहेत. मागील दोन वर्षापासून मुलांना काहीच येईना, इंग्लिश स्कूलमध्ये मुलांना प्रवेश करून द्यायचा असल्यास पंधरा हजारांपासून फिस भरावे लागते. आम्ही गरीबांनी ऐवढे पैसे आणायचे कोठून असा प्रश्न आमच्या समोर पडला आहे. तरी शासनाने लवकरच अंगणवाड्या चालू करावेत."

   _ इरफान शेख, पालक पाचोड.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close