शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२
उपसरपंचाने उसने पैसे न दिल्याने ग्रामपंचायत सदस्याने विषारी औषध प्यायले..!!
अहमदनगर : बऱ्याच वेळा चुकीचे आर्थिक व्यवहार हेच आत्महत्येचे कारण ठरतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार काळजीने होणे आवश्यक असतात. असाच एक प्रकार निंबळक ( ता. नगर ) मध्ये घडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.
निंबळक ग्रामपंचायतचे माजी सदस्य गणेश कोतकर यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी संदीप कोतकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निंबळकचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला आहे.
त्या नेत्याने आपल्या एकुलत्या एक मरणासन्न मुलाचे ऑक्सिजन काढून घेतले
फिर्यादीत म्हंटले आहे की, उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांनी गणेश कोतकर यांची चार लाख रूपये उसणे दिले होते. त्यांनी आठ महिन्यापूर्वी बाळासाहेब कोतकर यांना आठ दिवसांच्या बोलीवर हॉटेल सार्थक येथे राजेंद्र कोतकर व सदाशिव रोहकले यांच्या समक्ष चार लाख रुपये उसनवारीवर दिले होते. मयत गणेश यांनी वेळोवेळी कोतकर यांना पैसे मागुन ही दिले नाहीत.
बाळासाहेब कोतकर यांना पैसे दिल्याबाबत विचारणा केली असता पैसे घेतले असल्याचे कबूल केले होते. मी चार दिवसांनी देणार असल्याचे मला सांगितले. माझा भाऊ गणेश हा कोतकर यांच्याकडे वेळोवेळी पैसे मागतच होता. परंतु कोतकर यांनी काही ना काही कारण सांगुन पैसे देण्यास टाळा टाळ करत होता. माझा भाऊ गणेश हा काही दिवसांपासून मानसिक तणावात आहे. तो जिवाचे काही बरे वाईट करून घेईल तुम्ही त्यांचे घेतलेल चार लाख रुपये परत देऊन टाका. त्याचे कुटुंब ताणतणावाखाली आहे. असे मी कोतकरला सांगितले होते. पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे गणेश यांनी विषारी औषध घेतले. उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गणेश हा मयत झाल्याचे आम्हाला सांगितले, असे फिर्यादीत म्हंटले आहे.
✒️Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

