shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यातील पश्चिम भागात म्हैसगाव महसूल हद्दीत पोलीस दूरक्षेत्र निर्माण करा- श्रमिक मुक्ती दलाची मागणी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२   

 राहुरी तालुक्यातील पश्चिम भागात म्हैसगाव महसूल हद्दीत पोलीस दूरक्षेत्र निर्माण करा- श्रमिक मुक्ती दलाची मागणी..!!

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील पश्चिम भाग अतिदुर्गम व डोंगराळ असा भाग म्हणून ओळखला जातो. पश्चिम भागात चिकलठाण, बुळे पठार कोळेवाडी, म्हैसगाव, दरडगाव थडी अशी एकूण पाच गावे येतात. तसेच त्याच्यांजवळच ताहाराबाद मंडल महसूल कार्यक्षेत्रात तहाराबाद, वाबळेवाडी, वरशिंदे, गडधे आखाडा, चिंचाळा अशी मोठी लोकसंख्या असलेली गावे आहेत. तालुक्याला मूलभूत समस्या किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत समस्या घेऊन येण्यासाठी म्हैसगाव सजा अंतर्गत महसूल विभागातील गावांना ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करून तालुक्याला यावे लागते, तसेच या भागातून मुळा नदी गेल्याने वाळू व्यवसाय तसेच कौटुंबिक कलह, छोट्या मोठ्या चोर्‍या असंख्य प्रकार घटना घडत आहेत, अवैध धंदे यांचे प्रमाण अधिक आहे. या भागाला स्वतंत्र पोलीस दुरक्षेत्र (पोलीस स्टेशन) होणे खूप गरजेचे आहे, म्हणून राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र म्हैसगाव सजा महसूल विभागात होणे अत्यंत गरजेचे आहे.
राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात वंचित, बहुजन, आदिवासी समुह हा अधिक प्रमाणात वास्तव्य करत आहे. अशा वास्तव्य करणाऱ्या एखादी तक्रार देण्यासाठी तालुक्याला यायचे असल्यास या भागातील समुहास आर्थिक झळ होताना दिसत आहे. म्हणून आपल्या पोलिस स्टेशन अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र (आऊट पोस्ट) या भागात सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यानिमित्ताने श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादीच्या वतीने दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी राहुरीचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयाच्या वतीने देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. तर पोलीस निरीक्षक, राहुरी पोलीस स्टेशन कार्यालय राहुरी यांना देखील प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले. लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर यांना देखील लेखी निवेदनाद्वारे कळविले जाणार आहे व योग्य पाठपुरावा केला जाणार आहे असे श्रमिकचे प्रमुख संदीप कोकाटे यांनी सांगितले.

 

श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने लेखी निवेदन देण्यासाठी संदीप कोकाटे, मच्छिंद्र दुधवडे, केदार तावजी, वर्षाताई बाचकर, चिमाबाई केदार, गोविंद वारे, संगीताबाई केदार, किसनाबाई केदार, तुकाराम केदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close