पूर्णा । प्रतिनिधी :- पूर्णा ते नांदेड दरम्यान दैनंदिन मालाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांनी अचानक पेट घेतल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील छत्रपती शिवाजी महाराजां यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपूर्ण शहरांमध्ये या व्यापाऱ्यांचा माल साहित्य घेऊन येणारी एम एस बावीस एजच 27 51 आणि आणि एक शहरामध्ये आले होते दोन्ही वाहने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातील एका दुकानासमोर उभी केली होती मध्यरात्रीच्या सुमारास या दोन्ही वाहनांना अचानक आग लागली. या आगीमध्ये साहित्य जळून खाक झाले असून पोलीस बंदोबस्त असतानाही आग पूर्ण शहरांमध्ये मागील काही दिवसापासून रात्रीची गस्त बंद आहे. एकीकडे पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त दाखवण्यात येत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पुतळ्यासमोर भर चौकात दोन वाहनांना अचानक आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा असून व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
याकडे पोलिस अधीक्षक परभणी यांनी तातडीने लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी केली आहे.

