शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संशोधण प्रशिक्षणासाठी निवड..!!
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भारतीय कृषि अनुसंधान परिषद राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर, पुणे येथे निवड
लोणी : शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमा अंतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कु.दिप्ती भास्कर शेळके, कु.भांगरे कोमल भागवत, कु.अत्रे तनवी विनोद यांची भारतीय कृषि अनुसंधान परिषद राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर पुणे येथे संशोधण प्रशिक्षणासाठी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
तसेच वरील संशोधण प्रशिक्षणसाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर पुणे येथील वरिष्ठ वैद्यानिक डॉ.भूषण बिबवे, डॉ.ए. जि. गुप्ता, डॉ.राम दत्ता अश्या प्रसिद्ध वैज्ञानिकाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सदर विद्यार्थी आपले तिन महिने प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समिती यांच्या समोर मांडणार आहे.
या विद्यार्थ्याचा यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के, सहसचिव भारत घोगरे, संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन केले. तसेच सदर विद्यार्थ्यांला महाविद्यालयातील प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे, डॉ.विशाल केदारी, प्रा. सौ.मिनल शेळके, प्रा.गाढे स्वरांजली, डॉ.अमित अडसूळ यांचे मार्गदर्शन लाभले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

