शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२
जिल्हा नियोजन समितीवर अविनाश आदिक यांची नियुक्ती..!!
श्रीरामपूर : राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आज सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देश दोन सदस्यासह जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले चार नाम निर्देशित सदस्य व विशेष निमंत्रितामध्ये १४ सदस्य अशा एकूण २० सदस्यांची नियुक्ती जिल्हा नियोजन समितीमध्ये केली आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस व महाराष्ट्र साखर कामगार फेडरेशन अध्यक्ष अविनाश आदिक यांची नियुक्ती झाल्याने श्रीरामपूर तालुक्यात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे अनेक विकासाची कामे हाती घेता येतील असे परिसरातील नागरिकांना, मतदारांना अपेक्षा आहे.
अविनाश आदिक यांना एक प्रकारे त्यांच्या कार्याची पावती मिळाली असून जिल्ह्यात त्यांचे हातून अनेक कामे मार्गी लागतील. जिल्हा नियोजन समितीवर विकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती अध्यक्षपदी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची तर सचिव पदी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे काम पाहणार आहेत. त्याच प्रमाणे शासनाचे आदेश क्रमांक डीएपी-२०१२१/प्र.क्र४०/का-१४८१ अ नुसार निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये नामनिर्देशित सदस्य- खा.सदाशिव लोखंडे, श्रीरामपूर आ.लहू कानडे, व जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले सदस्य म्हणून प्रभाकर गाडे बारागाव नांदूर, अविनाश गोविंदराव आदिक [श्रीरामपूर], बाबासाहेब दिघे [श्रीरामपूर], हर्षवर्धन बोठे [वाळकी] यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ क्षितीज घुले, ऋषिकेश ढाकणे [पाथर्डी], बाबासाहेब तरटे [भाळवणी], पोपटराव दराडे [समशेरपूर], सोनाली रोहमारे [कोपरगाव], प्रवीण घुले [कर्जत], बी आर चकोर [संगमनेर], मधुकर नवले [अकोले], जयंत वाघ [अहमदनगर], विशाल झावरे [कोपरगाव], संजय काशीद [जामखेड], शरद झोडगे [नागरदेवळे], भागवत मुंगसे [देवळाली प्रवरा], अभिजित खोसे [अहमदनगर] यांना समितीमध्ये स्थान मिळाले आहे. अविनाश आदिक यांच्या निवडीचे श्रीरामपूर व जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

