प्रतिनिधी : किशोर चाकोते
मेहेकरी : ४ / अ. जि. म. वि. प्रसारक समाजाचे श्री. सद्गुरु माध्य. व उच्च माध्य. विद्यालय मेहेकरी ता. नगर येथे कार्यरत असणारे प्रा. प्रविण रमेश काकडे( एम्. एस्. सी. बी. एड्.) (फिजिक्स) हे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सेट परीक्षा उतीर्ण झालेले आहेत.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमारजी झावरे पाटील सेक्रेटरी मा. श्री. जी. डी. खानदेशे साहेब उपाध्यक्ष मा. श्री. रा. ह. दरे साहेब, सहसचिव मा.श्री.ॲड. विश्वासराव आठरे पाटील खजिनदार मा. श्री. डॉ. विवेकजी भापकर साहेब तसेच संस्थेचे विश्वस्त मा.श्री.मुकेश माधवराव मुळे साहेब, विश्वस्त मा. ॲड. श्रीम. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, विश्वस्त मा. श्री. जयंत रामनाथ वाघ साहेब, विद्यालयाच्या प्राचार्या सौ. मोरे एम. ए. पर्यवेक्षक श्री. गायकवाड बी.आर. व सर्व सेवक वृंद यांनी अभिनंदन केले.
अहमदनगर महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पी.बी.शेळके सर व सर्व सहाय्यक प्राध्यापकांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

