इंदापूर तालुका कृषी संघटनेच्या अध्यक्षपदीअमोलशेठ भिसे यांची निवड.
इंदापूर:- तालुक्यातील बि -बियाणे , शेती औषधे व रासायनिक खते यांची तालुकास्तरीय संघटना स्थापन करण्यात आली, ' हॉटेल निर्सग येथे मिटिंग आयोजीत करण्यात आली होती . तालुक्यातील २५० व्यवसायीक या वेळी उपस्थित होते, त्यावेळी तालुका कृषी संघटनेची स्थापना करण्यात आली, या वेळी, अमोल हरिदास भिसे अध्यक्ष, इंदापूर , रोहिदास चव्हाण उपाध्यक्ष अनिल शहा,खजिनदार संजय शहा , विनोद गांधी , अभंग महाराज , संतोष जाधव . रविंद्र शिंदे , किरण नगरे , यांचीही निवडकरण्यात आली . त्यावेळी नुतन अध्यक्ष अमोल भिसे यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व संघटनेचे आधारस्तंभ मधुकर भरणे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला ,
त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल भिसे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले . तालुक्यातील विक्रेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे . विक्रेत्यांचा कोणताही दोष नसताना अनेक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे . त्यासाठी आपली तालुका कृषी संघटना असणे गरजेचे होते . माझी अध्यक्षपदी निवडकरून माझ्यावरती मोठी जबाबदारी टाकली आहे . आपल्या व्यवसायात येणाऱ्या अडी अडचणी बद्दल मला आपण केव्हाही संपर्क करावा . मी आपल्या आडचणी प्रमाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे . त्यावेळी सुत्रसंचालन अनिल शहा व अतुल पाटील यांनी केले .तर आभार संजय मोरे यांनी मानले,हा कार्यक्रम शोशल डिस्टंन्स ठेवून व सॅनिटायझर आणी मास्क चा वापर करून पार पडला...

