shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गावठी व बनावट मद्य निर्मितीसाठी टँकर चालकाकडून मद्यार्कची विक्री..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२     

 गावठी व बनावट मद्य निर्मितीसाठी टँकर चालकाकडून मद्यार्कची विक्री..!!

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा हद्दीत टँकर मधुन मद्यार्क काढुन विक्री करताना रंगेहाथ पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून ४५ लाखाचा मुद्देमाल पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरचे मद्यार्क गावठी व बनावट मद्य निर्मितीसाठी वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या पर्यंत अधिकाऱ्यांचे हाथ पोहचतील का?
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परराज्यातील महाराष्ट्राच्या हद्दितून जाणारे टँकर तपासणी करत असताना मिळालेल्या माहितीवरुन मध्यप्रदेश येथून केरळ राज्यात मद्यार्क घेऊन जाणारे टँकर तपासणी करत असताना हॉटेल जम्मू हिमाचल पंजाबी चौधरी धाबाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नगर मनमाड रोड लगत देवळाली प्रवरा शिवार तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी टँकर क्रमांक MP:09 HH7648 या टँकरमधून मद्यार्क टँकर चे झाकणाचे सिल तोडून पाइपच्या साहाय्याने पिकअप मध्ये असलेल्या 35 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये काढलेले एकूण 280 लिटर मदयार्क पिकअप मध्ये आढळून आले.

 

पिकअपचा क्रमांक MH 12 LT.4047 असा आहे. सदर ठिकाणावरुन आरोपी टँकर चालक मालक व पिकअप चालक-मालक आदी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. हा टँकर ओअसिस डिस्टिलरी लिमीटेड धार (मध्य प्रदेश) येथून युनायटेड डिस्टिलरीज केरळ येथे चाललेला होता. सदर टँकरमध्ये 30 हजार लिटर अति शुद्ध मद्यार्क असल्याची कागदपत्रावरील नोंदीवरुन समजतेे. टँकरचा आयात व निर्यात परवाना आहे. परंतु टँकर मधील अतिशुद्ध मद्यार्कची मोजदाद केली असता मद्यार्क टँकर मध्ये तफावत असल्याचे दिसून आले. आयात निर्यात परवाना असलेल्या टँकरचे सील तोडून मद्यार्क काढण्यात आले सदरील मद्द्यार्क हे बनावट मदय व हातभट्टी गावठी दारू मध्ये मिश्रण करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता होती. सदर कारवाई मध्ये दोन वाहनांसह 45 लाख 11 हजार 360 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पळून गेलेल्या इसमा विरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री कांतीलाल उमाप साहेब, उषा वर्मा संचालक अमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क, मुंबई, श्री प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क पुणे व श्री गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री नितेश शेंडे उपाधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, श्री अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, श्री गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक श्रीरामपूर, श्री संजय कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव, दुय्यम निरीक्षक श्री के यु छत्रे, नंदू परते व अजित बडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सर्वश्री के के शेख, आर बी कदम व नारायण तुबे जवान सर्वश्री पी पी साळवे, बी के नागरे व बी बी करंजुले महिला जवान श्रीमती एस आर फटांगरे, वाहन चालक नि जवान श्री विपुल करपे, सुशांत कासुळे व दीपक बर्डे इ. यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेतला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री गोपाल चांदेकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक श्रीरामपूर हे करत आहेत.

 

सदरचे मद्यार्क गावठी व बनावट मद्य निर्मितीसाठी वापर केला जात असल्याचे उघड झाल्याने बनावट मद्य निर्मिती पर्यंत अधिकाऱ्यांचे हात पोहचतील का? असा सर्वसामान्य वर्गातुन केला जात आहे.


✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close