shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज त्या जोडीच्या लहान मुलाचा म्हणजे शिव चा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२     

आज त्या जोडीच्या लहान मुलाचा म्हणजे शिव चा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा..!!

देवळाली प्रवरा : येथील येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे पुतणे किशोर राजेंद्र ढुस यांनी काही महिन्यापूर्वी कोरोनात पती गमावलेल्या भगिनीला तिच्या बाळासह स्वीकारत पुर्नविवाह करत समाजापुढे आदर्श ठेवला होता. हा आदर्श समोर ठेवत राज्यात आणखी काही विवाह जुळुन आले. या विवाहाची महाराष्ट्रभर चर्चा झाली. 

       आज त्या जोडीच्या लहान मुलाचा म्हणजे शिव चा पहिला वाढदिवस. तो आज खुप उत्साहात साजरा झाला. मुलासहित एखाद्या भगिनीचा स्वीकार करुन त्या मुलाला आंतरिक प्रेम देत त्याचा वाढदिवस जोरदार साजरा करणा-या या कुटुंबाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. देवळाली हेल्फ टीमच्या वतीने केक नेवुन आनंदात सहभाग नोंदविला. प्रसंगी किशोरचे आजोबा दगडू ढुस, वडील राजेंद्र ढुस, चुलते आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेसह समस्त ढुस परिवार, हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे आदी उपस्थित होते.

देवळाली प्रवरा येथील येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे पुतणे किशोर राजेंद्र ढुस यांनी काही महिन्यापूर्वी कोरोनात पती गमावलेल्या भगिनीला तिच्या बाळासह स्वीकारत पुर्नविवाह करत समाजापुढे आदर्श ठेवला होता. हा आदर्श समोर ठेवत राज्यात आणखी काही विवाह जुळुन आले. या विवाहाची महाराष्ट्रभर चर्चा झाली. 
       आज त्या जोडीच्या लहान मुलाचा म्हणजे शिव चा पहिला वाढदिवस. तो आज खुप उत्साहात साजरा झाला. मुलासहित एखाद्या भगिनीचा स्वीकार करुन त्या मुलाला आंतरिक प्रेम देत त्याचा वाढदिवस जोरदार साजरा करणा-या या कुटुंबाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. देवळाली हेल्फ टीमच्या वतीने केक नेवुन आनंदात सहभाग नोंदविला. प्रसंगी किशोरचे आजोबा दगडू ढुस, वडील राजेंद्र ढुस, चुलते आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेसह समस्त ढुस परिवार, हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे आदी उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close