shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिमुकल्याचा ओढ्यावरील नाल्यात पडून मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२     

 चिमुकल्याचा ओढ्यावरील नाल्यात पडून मृत्यू..!!

राहुरी : कणगर ता.राहुरी येथिल शोयब साजिद शेख वय 6 वर्ष हा माळवाडी पिंपळदरा येथिल किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेला असता ओढ्यावरील नाल्यात पडून या बालकाचा मृत्यू झाला आहे. बालकाच्या मृत्यूमुळे कणगर गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कणगर येथिल कणगर तांभेरे रोड वरील घाडगे वस्तीवर राहणारे शेख कुटुंबामधील शोयब हा रविवारी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान माळवाडी पिंपळदरा येथिल किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेला होता. ओढ्यावरील बंधाऱ्याच्या नाल्यात पडला. हा खड्डा साधारण 10 ते 15 फुट खोल असुन पाण्याने भरलेला आहे. शोयब हा खड्ड्यात पडल्यावर तळाच्या गाळात रुतुन बसल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही.
 

सायंकाळी उशिरा शोयब घरात नसल्याचे लक्षात आल्यावर शोधा शोध सुरु झाली. कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी ग्रामसुरक्षा यंञणेवरुन सोशल मिडीयाद्वारे संदेश पाठवून गावातील नागरीकांना माहिती दिली. सरपंच घाडगे, उपसरपंच बाबासाहेब गाडे, पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे, जयसिंग घाडगे, शिवाजी जाधव आदींनी परीसरात राञभर शोध घेतला. परंतू शोयब सापडला नाही. सोमवारी सकाळी ओढ्यावरील नाल्याच्या खड्ड्यात शोयबचा मृतदेह तरंगत असताना स्थानिक व्यक्तीने पाहिला. त्याने पोलिस पाटील मुसमाडे यांना या घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी राहुरी पोलिस ठाण्यास कळवून घटनास्थळी गेले असता शोयबचा मृतदेह असल्याची खाञी केली. अनिल बर्डे, सिराज इनामदार, नदीम शेख आदींनी मृतदेह बाहेर काढला. जागेवर पंचनामा करुन साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहीनीतून रविंद्र देवगिरे यांनी शवविच्छेदनासाठी नेले. शोयब याच्या पश्चात आई वडील, लहान भाऊ, आजोबा असा परीवार आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close