shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा ...!

दोन्ही माजी आमदारासह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
जिंतूरातील मतदान केंद्राबाहेर गदारोळ प्रकरणी कारवाई

पूर्णा/वार्ताहर

शहरातील औद्योगिक वसाहतीच्या १० जागांसाठी रविवारी (दि.२७)  जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये मतदान सुरू असताना भाजपा व राष्ट्रवादीच्या दोन्ही माजी आमदारांनी आपआपल्या समर्थकांसह मतदान केंद्राबाहेर जमून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून शंभर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, रविवारी (दि.२७)सकाळी ९.३० च्या सुमारास औद्योगिक वसाहतीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये मतदान सुरू असताना भाजपा समर्थक माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, ऍड.गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी, लक्ष्मण बुधवंत, दत्ता कटारे, नागेश अकात, मुन्ना गोरे, सुमेध सुर्यवंशी, एकनाथ देशमुख, लक्ष्मण इलग, बार्शीकर, अशोक बुधवंत, डॉ.पंडित दराडे, मुटकुळे तसेच राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे, बाळासाहेब भांबळे, बाळु काजळे, मनोज थिटे, हकीम लाला, कल्याण देशमुख, शोएब जानिमिया, रामचंद्र डोबे, दीपक शेंद्रे, शाहेद बेग मिर्झा,प्रल्हाद भांबळे, संजय निकाळजे,संजय भांबळे व दोन्ही पक्षाच्या जवळपास शंभर समर्थक कार्यकर्त्यांनी आपआपसामध्ये झोंबाझोबी करत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे या सर्व जणांविरुद्ध कलम १४३,१४७,१४९,५०४ सह कलम ३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास फौजदार कोकाटे हे करत आहे.


शहरातील औद्योेगिक वसाहतीसंदर्भात मतदान सुरू असताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह तसेच भडकावू पोस्ट स्वतःच्या व्हॉट्सअप समूहावर टाकल्याबद्दल प्रेक्षा भाबळे, अक्षय पाटील, आकाश चव्हाण, आनंदराव डोईफोडे,विष्णू बागल,संजय भांबळे या सहा जणांविरुद्ध पोलीस कर्मचारी नितीन राठोड यांच्या फिर्यादिवरून कलम ५०५(२) भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
close