shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

...अखेर सरकारकडून मागण्या मान्य, खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२

...अखेर सरकारकडून मागण्या मान्य, खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे..!!

संभाजीराजानंच उपोषण मागे ; मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्या पूर्ण..!!

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेली दोन दिवस सुरू असलेलं उपोषण हे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सोडलं आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून राज्य सरकारकडून जे फायदे देता येतील ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपल्या लढ्याला आज यश मिळाले आहे. आजचा दिवस हा आनंदाचा, विजयाचा दिवस आहे असे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्याही माहिती जनसमुदायाला दिली. नगरविकास मंत्री शिंदे यांनी आझाद मैदान येथे उपस्थित असलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांपुढे मागण्या वाचून दाखविल्या. 

न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश 
सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश देण्यात आला. परंतु, सप्टेंबर 2020 नंतर सुधारित निवड यादी नुसार जे एसीबीसीएस, ईडब्ल्यूएस उमेदवार शासकीय सेवेतून बाहेर पडले. त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून अधिसंख्य पद म्हणजे सिलेक्शन झालं होतं किंवा पॉईंट मिळाली नव्हती अशा सर्व तरुणांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत यावर खूप चर्चा झाली. कायदेशीर मुद्दे उपस्थित केले गेले. पण, मुख्यमंत्री यांनी काय होईल ते बघू. आपण कायदेशीर लढाई लढतोच आहोत. परंतु, हा प्रलंबित विषय आहे. आपलेच लोक सिलेक्शन होऊनही नोकरीपासून वंचित आहेत. त्यांच्याबद्दल आपणाला निर्णय घेता येईल. तंटामुळे अधिसंख्य पद निर्माण करण्यात येणार आहे. एक महिन्याच्या आत हे पद निर्माण करण्यात येणार आहे असे ते म्हणाले. 


कोणत्या मागण्या झाल्या मान्य?..!!

१) सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट ३० जूनपर्यंत तयार करणार

२) सारथीमधील रिक्त पदं मार्च २०२२ पर्यंत भरणार

३) आण्णासाहेब पाटील महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा निधी देणार

४) गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वसतीगृहांचं उद्घाटन करणार

५) मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झालेल्या तरुणांचे गुन्हे मागे घेणार

६) मराठा आंदोलनात मृत पावलेल्या नातेवाईकांना एसटी महामंडळात १८ जणांना नोकरी देण्यात आली आहे, इतरांनाही ताबडतोब नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

७) ज्यांचावर गुन्ह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील देखील गुन्हे मागे घेण्याबाबत केस टू केस प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल.

८) त्याचबरोबर असे जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतू न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा निर्णय घेण्यात येईल.

९) आंदोलनात मृत पावलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तींच्या कागदपात्रांची पूर्तता करून नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत गृहमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मी स्वतः पाठपुरावा करणार आहोत. ज्यांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबत केस टू केस प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल. जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतु न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल. आंदोलनात मृत पावलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close