shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा आरक्षणासाठी मुस्लिम तरुणाचे अन्नत्याग उपोषण..शेवट पर्यंत मराठा समाजासोबत राहू- जैद शेख

प्रतिनिधी । विशाल लोंढे :-
खासदार संभाजीराजे भोसले मराठा आरक्षणावर आणि इतर मागण्यांसंदर्भात काल मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देत स्मायलिंग अस्मिता, कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी अहमदनगरमध्ये छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे उपोषणाला बसून पाठिंबा दिला आहे


मुंबईत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर उपोषण पुकारले आहे. यामध्ये आम्ही देखील अहमदनगर शहरातून सहभागी होत आहोत. सकाळी १० वाजल्यापासून साखळी पध्दतीने अन्नत्याग करणार आहे. मराठा आरक्षणावर प्रत्येक वेळी आम्ही सहभागी असतो मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागणीसाठी . आणि अनेक वर्षापासून लढा उभारून सुद्धा अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. तो त्यांना लवकरात लवकर मिळावा आणि सोबतच्या मागण्या पूर्ण व्हाव्या. 2017 मध्ये सुद्धा आम्ही मराठा समाज सोबत होतो आणि शेवटपर्यंत राहु असे मुस्लिम समाज तर्फे आलेले जैद शेख म्हणाले.या प्रश्नामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि इतर सर्व क्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित होते.
close