एरंडगाव :- शेवगाव तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक 2021 /22 ते 26 /27 करिता जाहीर झाली असून या निवडणुकीत ज्ञानेश्वर शेतकरी विकास आघाडी प्रचार शुभारंभ विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये नुकताच संपन्न झाला.
बाळासाहेब धस यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना असे सांगितले की जिल्हा बँकेमध्ये जसे सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन जसा पॅनल करतात तसाच पॅनल एरंडगाव भागवत,एरंडगाव, समसुद, लाखेफळ येथील कार्यकर्त्यांनी केला आहे तसेच केवळ सत्ता व खुर्चीचा अभिमान न बाळगता शेतकरी सभासदांची कामे प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी भर दिला जाईल.
बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ घेता होईल अशा विविध योजना राबविण्यात येतील. सभासदांच्या कामासाठी आपण असेही त्यांनी बोलताना सांगितले शेतकरी हिताकरिता शेतसाठी आवश्यक असणारे साहित्य विक्रीचे दालन करणार आहोत.
त्यासाठी सभासदांना शेतकरी विकास आघाडी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांनी आपल्या भाषणातून सोसायटी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणार असल्याचे सांगितले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असेही यावेळी गोकुळ भागवत यांनी आवर्जून सांगितले दीपावलीसाठी जर डिव्हिडंड पाहिजे असेल तर शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करायचे आहे.
मारुती भागवत, महेश गाडेकर, भारत भागवत सोमनाथ लोखंडे यांनी आपले मनोगत केली. त्यावेळी अशोकराव धस, जगन्नाथ भागवत, आप्पासाहेब आवारे, हनुमंत बेळगे, भास्कर भागवत ,उत्तम भागवत, साहेबराव भागवत, सचिन धस, प्रसाद धस, सचिन जाधव, शालमोन गजभिव यांच्यासह सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

