shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांचा राज्यमंत्री मा. ना. बच्चुभाऊ कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२

आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांचा राज्यमंत्री मा. ना. बच्चुभाऊ कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश..!!

देवळाली प्रवरा प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने त्यांचा सत्कार ...

राहुरी : प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाअध्यक्ष अभिजीत पोटे यांनी ढुस यांना सोपवली श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदाची जबाबदारी.
संध्या सामाजिक जान असलेला व सामान्य जनतेच्या हाकेला धाऊन जाणारे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार बद्दल आम जनते मध्ये प्रतिमा तयार झाली आहे 
देवळाली प्रवरा आरोग्य हेल्थ टीम च्या माध्यमातून ढुस यांनी कोरोना काळात आपलं आरोग्य सेवेचे काम सुरु केले 
एक कोरोना विधवा पुर्नर विवाह साठी पुढाकार घेतला 
ढुस यांनी आपल्या समाजसेवा करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष योग्य असल्याचे मानून पक्ष प्रवेश केला आहे.
 
      श्रीरामपुर तालुका व राहुरी च्या देवळाली प्रवरा व 32 गांवात प्रहार च्या शाखा स्थापित करण्याचा मनोदय अप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केला यावेळी प्रहार धरण ग्रस्त अध्यक्ष कृष्णा सातपुते सातपुते , अॅड पांडुरंग औताडे,बाळासाहेब खर्जुले याच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
"आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांची प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या श्रीरामपूर विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेबद्दल देवळाली प्रवरा प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने त्यांचा सत्कार करतांना राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, उपअध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी, देवळाली प्रवरा दिव्यांग शहर अध्यक्ष व राहुरी तालुका सल्लागार सलीमभाई शेख देवळाली प्रवरा दिव्यांग चे सचिव राजेंद्र सोनवणे , बाळासाहेब सोनवणे, संदिप बोरसे 
टाकळीमिया शाखा उपअध्यक्ष सुरेश दानवे, टाकळीमिया संघटक शंकर कागळे मामा 
श्रीरामपुर सुनिल कानडे 
आदि.उपस्थित होते."

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close