शिर्डी । प्रतिनिधी :
अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.जयदत्त आण्णा क्षिरसागर साहेब यांच्या मुंबई वरळी येथील सुखदा कार्यालयात उत्तर अहमदनगर जिल्हातील जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांची संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा करण्यात आली.
उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील समाजातील कामात येणाऱ्या अडीअडचणी व भविष्यात घेण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांबाबत दीर्घ चर्चा करण्यात आली व नियोजन करण्यासाठी श्री.जयदत्त आण्णा साहेबांनी सर्व विषय ऐकून घेतले त्या विषयावर विचार करून योग्य मार्गदर्शन केले चर्चा करताना आण्णांनी तब्बल तीन तास आवर्जून वेळ दिला व सर्व जिल्हा कार्यकरिणीस पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी आण्णासाहेबांचे सुपुत्र मा श्री.हर्षद दादा क्षिरसागर यांनी सर्वांची आत्मियतेने विचारपूस केली व जिल्हा कार्यकारिणी ओळख करून घेतली व पुढील काही दिवसांत शिर्डी येथे येऊन भेट घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी विदर्भातील मा.खासदार व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी श्री सुरेशभाऊ वाघमारे यांनी पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा केली उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हाध्यक्ष श्री.अॅड.विक्रांत वाघचौरे, जिल्हा सचिव श्री.कैलासभाऊ बनसोडे, जिल्हा निरीक्षक श्री.बद्रिनाथ लोखंडे, जिल्हा संघटक श्री.देविदासजी कहाणे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.एकनाथराव नागले, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्री.अनिलभाऊ जाधव, श्री.गणेशजी वाघचौरे, तेली समाज युवा सामाजिक कार्यकर्ते यावेळी महत्त्वपूर्ण बैठकीत उपस्थित होते.

