प्रतिनिधी : निरज चांगटे
दौलावडगाव : २ / मंगळवार दि . १ फेब्रुवारी रोजी आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेकडून वेंको रिसर्च अँड बर्डिंग फाॕर्म प्रा.लिमिटेड कंपनीचे श्रीकांत गोले ग्रूप मॕनेजर व डाॕ.निलेश जोगदंड आॕपरेशन मॕनेजर यांना स्थानिक कामगारांना महाराष्ट्र शासन निर्णय २००८ नुसार स्थानिक कामगारांना ८०% रोजगार मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून कोराना महामारीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातून गोर गरिब कामगारांना सावरण्यासाठी स्थानिक लोकांना काम मिळाले तर त्यांच्या हाताला काम मिळेल व कंपनी वाढीस चालना मिळेल.म्हणून आपण स्थानिक कामगारांना प्राधान्य द्यावे अन्यथा आपण लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनकर्ते अहमदनगर जिल्हा कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष लांडे,सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे अध्यक्ष किरणभाऊ पिसोरे यांनी दिला.
यावेळी सरपंच एकनाथ वाणी,मा.सरपंच अशोक हजारे,ग्राम.पंचायत सद्स्य गोटिराम कोहक,अरबाज खान,गणेश फसले,असाराम कोहक आदी उपस्थित होते.

