अखिल भारतीय मेहतर समाजाने उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे
नगर : २ / अखिल भारतीय मेहतर समाज संघटना यांच्या वतीने पंजाब येथील आम आदमी पार्टी पक्षाचे नेते भगवंत मान यांच्या निवडणूक प्रचार दरम्यान २६ जानेवारी रोजी स्वतःच्या गळ्यातील हार काढून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे अखिल भारतीय मेहेतर समाज संघटना यांच्या वतीने मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून भगवंत मान यांचा निषेध करत जोडे मारून पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, धीरज बैद ,अभिषेक भगवाने, संजय खरे,अतुल अपिल, बाबू लाल बेगी,प्रशांत पाटोळे ,तुषार खळेकर ,जालिंदर खराडे ,विशाल ढकोलीया, सुधाकर गिलशेर ,विक्रम चौहान, अॅड.योगेश देवकर आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे म्हणाले, आम आदमी पार्टीचे नेते भगवत मान यांनी स्वतःचे गळ्यातील हार काढून बाबासाहेबांच्या पुतळ्यास घालून सर्व देशवासीयांचे भावना दुखावल्या आहे. समाजात तेढ निर्माण करणारे समाजकंटक राजकीय नेत्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा संघटना व दलित समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .

