इंदापूर येथील नुतन न्यायालयीन इमारतीचे आभासी पध्दतीने होणार उदघाटन...
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उदघाटन दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या दरम्यान मा. न्यायमूर्ती श्री.नितीन जामदार साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते आभासी पध्दतीने होणार आहे.
सदर कार्यक्रम हा मा. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे सदर कार्यक्रमास आभासी पध्दतीने प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
तसेच, आदिती तटकरे, राज्यमंत्री, विधी व न्याय विभाग, दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. संजय देशमुख ,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पध्दतीने कोविड- १९ च्या नियमांचे पालन करुन उदघाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी, उदघाटनाच्या कार्यक्रमास आभासी पध्दतीने उपस्थित रहावे असे आवाहन मा.पी.एल.पाटील, दिवाणी न्यायाधीश क स्तर, इंदापूर व ॲड. पी.व्ही. खरात, अध्यक्ष, वकील संघ, इंदापूर यांनी केले आहे.
सदर आभासी तंत्रज्ञानाची Youtube link लिंक
https://youtu.be/aEI-XfJ9r14 ही आहे.

