शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२
अभिमानास्पद.!! धामोरी गावच्या शेतकरी पुत्राने वयाच्या आठराव्या वर्षी सुरू केली आयटी कंपनी...!!
राहुरी : तालुक्यातील धामोरी खुर्द येथील तरूण,तडफदार , शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तिमत्त्वाने जे काही करून दाखवले त्यावर भल्याभल्यांची झोप उडविणारे,विश्र्वास बसणार नाही, तरुणांचा रोल मॉडेल म्हणून नावारूपास आला; तो ऋषिकेश भाऊसाहेब शिंदे या मुलाने वयाच्या अठराव्या वर्षी कोडिओ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीची स्थापना केली . १३ एप्रिल २०२१ रोजी कोडिओ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचे काम धामोरी गावात ऋषिकेश च्या घरातून चालू झाले .ऋषिकेश ने अतिशय जिद्दीने रात्रीचा दिवस केला व त्याने ऑनलाईनच लाखोंमध्ये टर्न वर केला अगदी सुरुवातीच्या काळात तीन महिन्यांमध्ये त्याचा टर्न ओव्हर १९ लाखांच्या पुढे होता. आजकालचे मुलं या वयामध्ये त्यांचा वेळ मौज मस्ती करण्यामध्ये घालवतात पण ऋषिकेश या सर्वांमध्ये वेगळा ठरला.
ऋषिकेश हा एक शेतकरी कुटुंबातला आहे त्यांनी एक शेतकऱ्याचा मुलगा ही आयटी कंपनीची सुरुवात करू शकतो व तिला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवू शकतो हे सिद्ध करून दाखवले.
ऋषिकेश सध्या अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये दुसऱ्या वर्षा मध्ये शिक्षण घेत आहे . तेथेही तो चांगला अभ्यास करत आहे. ऋषिकेश च्या कंपनीमध्ये सध्या ६५ इंजिनियर कार्यरत आहेत. मधल्या काही काळामध्ये ऋषिकेश कडे १२७ पेक्षा जास्त युवक कार्यरत होते. कोडीओ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ही आजच्या युगामध्ये सॉफ्टवेअर जगात खूप काही नवीन इंवेंशन करत आहे . जानेवारी महिन्यामध्ये ऋषिकेश हा हॉटेल व्यवसाय मध्ये गुंतला त्याच्यामध्ये तो तोट्यात गेला पण तो खचला नाही . तो उठला तो लढला आणि त्यांनी जिंकूनही दाखवले त्याने स्वतःला सिद्ध केले आज ऋषिकेश शिंदेला महाराष्ट्राचा उद्योजक रत्न पुरस्कार भेटला. खरंच ना ही आश्चर्यजनक च गोष्ट आहे की ज्या कंपनीला एक वर्ष पूर्ण झालं नाही त्या कंपनीने महाराष्ट्रात बेस्ट ट्रस्ट अँड सॉफ्टवेअर कंपनीचा पुरस्कार घेतला. ऋषिकेश हा अनेक युवकांचा रोल मॉडेल बनला आहे. Reseal.in संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योजक रत्न पुरस्कार आज ऋषिकेश शिंदे ला नाशिक शहरामध्ये भेटला त्याचे प्रसारण २६,२७ तारखेला न्यूज 18 लोकमत वरती होणार आहे. आज ऋषिकेश चे आई-वडील खरच खूप खुश असतील त्यांच्या मुलाला एवढा मोठा पुरस्कार भेटला आहे. मानतात की प्रत्येकाच्या नशिबात काय मिळावे हे आधीच लिहिले असते पण जर परिश्रम करण्याची तयारी असेल तर जे नशीबात लिहिलेले नसते ते देखील मिळू शकते. या युक्ती प्रमाने ऋषिकेश ने खरे करून दाखवले.
बाबासाहेब सोनवणे,डॉ. सतिश सोनवणे,दत्तात्रय सोनवणे,भाऊसाहेब जाधव,भानुदास कल्हापुरे,मछिंद्र सोनवणे,प्रमोद जाधव,बाळासाहेब सोनवणे,अर्जुन शिंदे,सोमनाथ कल्हापुरे, तुषार सोनवणे तसेच सर्व मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थ धामोरी खुर्द यांनी ऋषिकेश चे अभिनंदन करुन पुढे देखिल अशीच उतरोत्तर प्रगती होत राहो गावाचे, तालुक्याचे, आणि तीर्थरूप आईवडिलांचं आणि स्वतःचं नाव जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवाव म्हणून शुभेच्छा देखील दिल्या.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

