शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२
आधार, ई -श्रम कार्ड शिबिराचे चे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून आयोजन..!!
राहुरी : तालुक्यातील म्हैसगाव येथील केदारेश्वर विद्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आधारकार्ड नवीन व दुरुस्तीचे ७५ व ईश्रम कार्ड २१ तयार करण्यात आले. यावेळी माझी नगराध्यक्ष डॉ उषाताई तनपुरे यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला . म्हैसगाव येथील नागरिकांनी पुन्हा एकदा येथे शिबीर आयोजित करण्याची मागणी केली असता त्यांनी पुन्हा आयोजित करण्याचे आश्वासीत केले. शिबीर आयोजित केल्यामुळे नागरिकांची गावातच सोय झाल्यामुळे मंत्री तनपुरे यांचे अनेकांनी आभार व्यक्त केले.
तसेच चेडगाव येथेही नवीन आधारकार्ड व दुरुस्ती साठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ४५ नागरीकांनी लाभ घेतला . यावेळी गावातील मान्यवरांनी शिबीरास भेट देऊन पाहणी केली . व शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानले.
म्हैसगाव व चेडगाव येथे शिबीर घेण्यासाठी मंत्री तनपुरे यांचे जनसंपर्क कार्यालय व दत्ता पेरणे, विकास कर्पे, नरेंद्र म्हसे यांनी व्यवस्था केली. या आधीही असे शिबीर आयोजित करण्यात आले होते आहे व या पुढे ही असे शिबीर गावो गावी घेणे सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

