shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गलांडवाडी नंबर १ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी विकास पांडुरंग गलांडे व व्हाईस चेअरमन पदी हरिदास महादेव जाधव यांची बिनविरोध निवड.

गलांडवाडी नंबर १ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी  विकास पांडुरंग गलांडे व व्हाईस चेअरमन पदी  हरिदास महादेव जाधव यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी:गलांडवाडी नंबर १ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गलांडवाडी  नं १ ता. इंदापूर जि. पुणे या संस्थेची सन २०२१ -२२ ते २०२६ -२७ या कालावधीत करता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून दि १५ फेब्रुवारी २०२२ रोजी चेअरमन पदी  विकास पांडुरंग गलांडे व व्हाईस चेअरमन पदी  हरिदास महादेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी जाधव मॅडम यांनी पाहिले. सदर निवडणूक पार पाडणे कामी मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  आप्पासाहेब जगदाळे ,  दीपक  जाधव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग बाबुराव गलांडे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याचे माजी संचालक  पांडुरंग मारुती गलांडे यांच्या मार्गदर्शन लाभले. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
 
यावेळी शिक्षक पतसंस्था चेअरमन  वसंत फलफले, रामेश्वर उत्तम गलांडे, वालचंद जावळे, सतीश अंकुश फलफले, बाबुराव पाडुळे, संतोष सुखदेव गलांडे, अंकुश सुखदेव गलांडे, भगवान कचरे, भागवत बोडके, तानाजी भोईटे हे उपस्थित होते.
सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कामे सर्व सभासद सहकारी संस्था निवडणूक अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले . यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळ विकास पांडुरंग गलांडे चेअरमन ,हरिदास महादेव जाधव व्हाईस चेअरमन, पांडुरंग बाबुराव गलांडे संचालक, विकास किसन फलफले संचालक,तानाजी भिकू कचरे संचालक, श्रीरंग अर्जुन फलफले संचालक, सुदाम गोरख गोरे  संचालक, उत्तम तानाजी जाधव संचालक,सुनीता तानाजी भोईटे संचालिका, सागर किसन सूळ संचालक, अंगत सदाशिव गार्डे संचालक, प्रियंका स्वप्निल इंगुले संचालिका,ज्योती भगवान मोरे संचालिका हे उपस्थित होते.
close