शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२
धामोरी खुर्द येथील शेतकरी पुत्र प्रा. प्रमोद जाधव यांची फरारी... महाराष्ट्र- सेट परिक्षेत उत्तीर्ण..!!
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये धामोरी हे एक छोटं गावं.! या गावात धामोरी खुर्द येथील एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रा. प्रमोद मधुकर जाधव यांनी नुकतीचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र- सेट परिक्षेत उत्तीर्ण होत, दैदिप्यमान यश मिळवले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या सी.एस.आय.आर. नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत देखील त्यांनी संपूर्ण भारतात ६९ वा क्रमांक पटकावला होता. त्याच पाठोपाठ त्यांनी आय.आय.टी बाॅम्बे ने घेतलेल्या -गेट परिक्षेत देखील त्यांनी बाजी मारली आहे. सलग तीन परिक्षेत नेत्रदीपक यश मिळवून त्यांनी आई वडीलांना सार्थ अभिमान मिळवुन दिला आहे. खर तर प्रमोदची घर ची परिस्थिती सर्वसामान्य असून आई-वडीलांनी मोलमजुरी करत प्रमोदला शिकवण्यासाठी कष्ट घेतले आहेत. खर तर आपल्या मुलाने उच्य शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ राहावं, जे हलाखीचे दिवस आपण काढले ते दिवस पुन्हा त्याच्या समोर येऊ नये हीच त्यांची अपेक्षा,आज प्रमोद ने त्या कष्टाचे चीज केले आहे. नगर जिल्ह्यातून सर्वच स्तरांतून प्रमोदचे व त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन होत आहे.
त्याने आपलं दहावीपर्यंतचे शिक्षण हे श्री शाहू विद्या मंदिर खडांबे येथून घेतले, त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण कन्या माध्यमिक विद्यालयात वांबोरी येथे घेतले होते. प्रथम श्रेणी विशेष प्राविण्य मिळवत बीएस्सी ची पदवी राहुरी महाविद्यालयातून तसेच एम.एस्सी.ऑरगॅनिक केमिस्ट्रीची पदवी आपलं छोट गावं सोडुन जिल्ह्याच्या ठिकाणी जात जिल्ह्यात असलेल्या अहमदनगर महाविद्यालयातून घेतली आहे. प्रमोदची घरची परिस्थिती ही सर्वसामान्य असल्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी प्रा.संदीप रोहोकले सरांनी वेळोवेळी विशेष सहकार्य केले. घरात कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक वारसा नसताना देखील त्यांनी आज ही उंची गाठली आहे, या बद्दल कौतुक होणं स्वाभाविकच आहे.
माणसं संघर्षातून मोठी होतात ह्याच जीवंत अनं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रा. प्रमोद जाधव हे आहेत,पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथे जाऊन स्पर्धा परिक्षेची तयारी केली. वेळप्रसंगी त्यांनी उपासमार सहन करत उघड्या मैदानात केलेल्या अभ्यासाचे पुरेपूर फळ त्यांना मिळाले आहे. सर्वसामान्य कौटुंबिक परिस्थिती असुनही अतिशय जिद्दीने त्यांनी हे यश संपादित केले. त्यांना स्पर्धा परीक्षासाठी प्रा.संदीप रोहोकले सरांनी मार्गदर्शन तसेच विशेष सहकार्य केले.
त्यांच्या या यशाबद्दल बाबासाहेब सोनवणे, सुप्रसिद्ध कॅन्सरसर्जन डाॅ. सतीश सोनवणे सर, श्री. अशोकराव उंडे,श्री.भास्करराव जाधव, श्री. बाळासाहेब लटके पाटील, श्री.भाऊसाहेब जाधव, श्री.शामराव खेसम्हाळसकर,श्री.गोरक्षनाथ जाधव मेजर, जेष्ठ पत्रकार श्री. भाऊसाहेब पटेकर व आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रा. प्रमोद जाधव हे सध्या देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहे.त्यांच्या पीएच.डी चे पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा आणि त्यांच्या आजवरच्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासाला आणि अपार जिद्दीला “शिर्डीे एक्स्प्रेस चा” चा मनापासून सलाम..!!
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

