shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊसतोड मजुरांची सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांचा रोट्रॅक्ट क्लबकडून सन्मान .

ऊसतोड मजुरांची सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांचा रोट्रॅक्ट क्लबकडून सन्मान 

दहा हजार पेक्षा अधिक ऊस तोड मजुरांना मोफत आरोग्य सेवा : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

 प्रतिनिधी इंदापूर:  इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षांपासून ऊसाच्या फडावर जावून, ऊसतोड मजुरांना मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांचा, रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या वतीने अध्यक्ष सागर शिंदे, जिल्हा प्रतिनिधी संकेत जैन, शंतनू अरविंदकर,  यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

रविवार ( दि. २७ फेब्रुवारी ) रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथे, केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण, संजय शेलार, आरोग्य सेवक डॉ. श्वेता शिंदे, परिचारिका पूजा धांदे, तनुजा गायकवाड, वॉर्डबॉय नितेश बेटेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ इंन्द्रेश्वरचे अध्यक्ष सागर शिंदे, सचिव विश्वास गाढवे, उपाध्यक्ष रामदास पवार, सार्जंट मच्छिंद्र किरकत, प्रशिक्षक अमोल राऊत, संचालक ज्ञानेश्वर वलेकर, सचिन चौगुले, रोहित साळुंखे आदी रोट्रॅक्टर उपस्थित होते. 

मागील दोन वर्षात शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या फिरता दवाखान्याच्या माध्यमातून दहा हजार पेक्षा अधिक ऊसतोड मजूरांसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. यामध्ये विविध आजरावरच्या गोळ्या, मलम, आजारी रुग्णांना इंजेक्शन असे विविध आरोग्य सेवा देण्यात आल्या असून, हा फिरता दवाखाना ऊस तोड मजुरांना  वरदान ठरला आहे. राज्यातील हा पहिला खाजगी उपक्रम असल्याने, सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

फोटो ओळ : इंदापूर येथे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांचा सन्मान करताना रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचे प्रतिनिधी
close