लाकडी येथे बैलगाडा शर्यतीस प्रारंभ..राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित शर्यतीला सुरुवात.
इंदापूर प्रतिनिधी:लाकडी तालुका इंदापूर येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीस इंदापूर तालुक्याची लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थिती दर्शवून बैलगाडीत बसून बैलांचा कासरा घेऊन बैलगाडी शर्यतीला सुरुवात त्यांच्या हस्ते करण्यात आले.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यती होत असून आज इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या बैलगाडा शर्यती ला प्रारंभ करण्यात आला .
अनेक वर्षांनी बैलगाडा शर्यती होत असल्याने बैलगाडा मालकांमध्ये आनंदाची वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत झाली नव्हती .आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी लाकडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तेथे आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत होते.

