shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्याहाळी केंद्रातील शिक्षकांची फलटण तालुक्यातील आदर्श शाळा 'माझेरी'ला भेट.

व्याहाळी केंद्रातील शिक्षकांची फलटण तालुक्यातील आदर्श शाळा 'माझेरी'ला भेट.

माझेरी शाळेला भेट देण्याचा उद्देश--12 तास 12 महिने भरणारी शाळा,गुणवत्ता, शिष्यवृत्ती, नवोदय,सैनिक शाळेला निवड होणारे विध्यार्थी व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेणे.........केंद्रप्रमुख संभाजी आजबे.

शाळेची वेळ,शिक्षकांचे कष्ट,विद्यार्थी व ग्रामस्थांची साथ हेच माझेरी शाळेच्या यशाचे गमक....बरकडे सर(माझेरी शाळा)
इंदापूर प्रतिनिधी:२६ फेब्रुवारी २०२२रोजी व्याहाळी केंद्रातील शिक्षकांनी माझेरी शाळेला भेट दिली.माझेरी शाळेतील शिक्षकांनी  केंद्रप्रमुख आजबे  व सर्व शिक्षक बंधू भगिनींचे स्वागत केले.केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी भेटीचा उद्देश सांगितला. नंतर माझेरी गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर दिघे यांनी शाळेचा व गावाचा इतिहास सांगितला. शिक्षक बरकडे सरांनी शाळेची २००३ ची स्थिती ते आजपर्यंतचा प्रवास सांगितला. शाळेचे वर्ग १ली ते ५ वी पर्यंत आहेत.शाळा १२ महिने रोज १२ तास चालू असते.शाळेची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत असते. अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,योगासने,मैदानी खेळ,कलाकृती,शिष्यवृत्ती यांचा सराव रोज घेतला जातो.हसतखेळत शिक्षण असल्यामुळे मुलांना कंटाळा येत नाही.नेमलेल्या स्वयंसेवकांना व मुलांना रोज ५ वाजता पालकांच्या वतीने नाश्ता दिला जातो.नुकताच शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार मिळाला आहे.गावची लोकसंख्या २०० च्या आत असून शाळेचा पट मात्र २७५ च्या वरती आहे.अभिमानास्पद जि. प. ची शाळा आहे.शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक, नवोदय,सैनिक शाळेला दरवर्षी निवड झालेले १० ते १२ विद्यार्थी एकट्या माझेरी शाळेचे असतात..अभ्यास व खेळात पण अव्वल मुले म्हटली की माझेरी शाळा हे गणित होऊन बसले आहे..पालकांचे सहकार्य व लोकसहभाग खूप मोलाचा आहे.
जे स्वयंसेवक नेमले आहेत त्यांचा पगार पालक वर्गणी करून देतात.इतर शिक्षकांनी देखील मार्गदर्शन केले. उपस्थित शिक्षकांनी त्यांना शंका विचारल्या.लॉकडाऊन काळात कसे शिक्षण दिले,पालक सहभाग मिळवण्यासाठी काय केले?,smc ची मदत कोठे घ्यावी?,शिष्यवृत्ती चे तास,अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे?मुले एवढा वेळ कशी काय बसतात?यासह अध्ययन अध्यापन तंत्रे विचारून घेतली.व्याहाळी केंद्राच्या वतीने आजबे यांच्या हस्ते तेथील विध्यार्थ्यांना ३०० पेन छोटीसी भेट म्हणून वाटप करण्यात आले.एका आदर्श व डिजिटल शाळेला भेट देऊन सर्व शिक्षक भारावून गेले व या शाळेतील अनेक उपक्रम आपण आपल्या इंदापूर तालुक्यात,केंद्रात राबवू असे सर्वांनी ठरवले.प्रतिभा जौजाळ मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.आभार आदर्श शिक्षक बापूराव जाधव सरांनी मानले.
आजच्या शाळा भेटीप्रसंगी माझेरी गावचे सरपंच, शाळा  समितीचे अध्यक्ष व सदस्य,केंद्रप्रमुख, होतकरू तरुण,स्वयंसेवक ,भेट देण्यासाठी आलेले शिक्षक,माझेरी शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.या भेटीचे कौतुक इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट ,गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे ,विस्ताराधिकारी सुनील मुगळे यांनी केले.*
close