shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा तालुक्यात बिबट्याची दहशत

बिबट्याचा बंदोबस्त करावा

प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

    करमाळा: दि. १०/ करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवर जाणाऱ्या हनुमंत नाळे यांना अवघे वीस - फुटाच्या अंतरावर बिबट्या दिसुन आला  . त्यावेळी  त्यांनी लागलीच या सर्व परिसरात  यासंदर्भात माहिती दिली .  त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग सावध झाला आहे. 

आज या बिबट्याने सुमारे पंधरा किलोमीटर अंतर म्हणजे उंदरगाव ते कात्रज हे अंतर पार केले आहे. कारण या बिबट्याने कात्रज परिसरातील दोन शेळ्या व एका वासरावर हल्ला करून ठार केले आहे . हा हल्ला शेळ्यांवर दिवसा तीनच्या सुमारास झाला‌. शेतकऱ्यांच्या समोर शेळीला ओढत नेले आहे .तर वासरावर रात्री हा हल्ला झाला आहे. यामुळे शेतकरी प्रचंड घाबरले आहेत.

संबंधीत प्रशासनाने याची दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे .
close