इंदापूर तालुक्यात गट आणि गण वाढले पण घोषित नसल्याने इच्छुक उमेदवार व मतदारांमध्ये संभ्रम.
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषदे व पंचायत समिती मागील निवडणुकीत ७ गट व १४ गण होते मात्र यावेळी ९ गट व १८ गण वाढल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे मात्र कोणते गट आणि गण माहीत नसल्याने मतदार संभ्रमावस्थेत आहेत आणि इच्छुक असणारे उमेदवार हे ही संभ्रमात आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या पार्श्वभूमीत इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी नऊ गट तर पंचायत समितीसाठी
अठरा गण वाढल्याचे वृत्त पुढे येत असून नक्की कोणते गट व गण नवीन झाले आहेत. या वाढीव गट व गणा मुळे इंदापूर तालुक्यातील सर्वच गट व गणांमध्ये बदल घडणार हे जनतेमध्ये विशेष चर्चा दिसून येते. परंतु इच्छुक उमेदवार यांना नक्की कोणते गट व गण आहेत हे घोषित न झाल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण असल्याचे जनतेच्या चर्चेतून दिसून येत आहे. हीच परिस्थिती जे मतदार आहेत त्यांनाही उत्सुकता लागली आहे की आपण कोणत्या गटात व गणात मतदान करणार आहोत. अशा परिस्थितीमध्ये सध्या जनतेत विशेष चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.
गट व गण घोषित झाल्याशिवाय इच्छुक उमेदवार ?
गट व गण घोषित झाल्याशिवाय इच्छुक उमेदवार कोण आहेत हे स्पष्ट कळणार नाहीत याचीही चर्चा जोरात होत असल्याचे दिसते .
कारण कोणत्या गावाला जायचे आहे हे स्पष्ट न झाल्याने गाडीत बसणे योग्य नाही.
तसेच गाव कोणते आहे हे कळल्याशिवाय कोणत्या गाडीत गावाला जावे हे इच्छुक विचार करतील तसेच काही जण सुरक्षित गाडीतून जाण्याचा प्रयत्न करतील तर काहीजण नेहमी ठरलेल्या गाडीतच त्या गावाला जाण्याचा प्रयत्न करतील. परंतु गाडीच्या क्षमतेनुसार आणि उत्तम कार्य व प्रभावी व्यक्तिमत्त्व असणाऱ्यांनाच या गाड्यांमध्ये क्षमते नुसार प्रथम प्राधान्य देत त्या गावाला जाण्यासाठी गाडीमध्ये संधी देतील हे लवकरच स्पष्ट होईल अशीही विश्लेषणात्मक चर्चा जनते घडत असते.
मतदार झाले चाणाक्ष?
इंदापूर तालुक्यातील मतदान अतिशय हुशार आणि चाणाक्ष असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये दिसून आले असून सध्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मतदार हे विचार करूनच निवडणुकीत आपले मत मतदान पेटीत करतील काय? यामध्ये मतदार हे उमेदवार कोण आहे तो गट व गणात सक्षम रित्या समाजाला उपयोगी असे कार्य करेल का? हे प्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करतील.
तसेच पक्ष्याच्या वतीने दिलेला उमेदवार नक्की पक्षाशी इमाने-इतबारे ने राहून जनतेच्या विकासाचे कार्य करू शकेल का ?याचाही विचार ज्या त्या पक्षातील कार्यकर्ते मतदार करतील तसेच जे पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी किंवा या पक्षातून दुसऱ्या पक्षात उमेदवारीसाठी जाऊन उमेदवारी घेतील .त्यांचाही मतदार त्याने घेतलेला निर्णय योग्य आहे का? याचा विचार करूनही ते मतदान करतील काय ? याचाही विचार या मतदानात होईल अशीही चर्चा जनतेत होत असल्याचे दिसून येते.
इंदापूर तालुक्यात सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुकीत उतरतील काय?
सध्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार व मंत्री आहेत, तर भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री आहेत. तसेच सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये ज्यांचे मुख्यमंत्री आहेत ते शिवसेना हा पक्षही आहे. तसेच सत्ताधाऱ्यांमध्ये काँग्रेस पक्षही आहे तो पक्ष ही इंदापूर तालुक्यात आहे. बारामती लोकसभा लढवलेली व माजी मंत्री यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, ही या ठिकाणी आहे.
सध्या तालुक्यातील सर्व पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करीत आहेत अशा स्थितीमध्ये सध्या राज्यात महाविकासआघाडीची सत्ता असून या सत्तेच्या जोरावर लोक उपयोगी योजना इंदापुर मध्ये येत असल्याचे दिसून येत आहे अशा मध्ये इंदापूर तालुक्यात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व काँग्रेस हे इंदापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्र येत निवडणूक लढवतील काय ? यासंदर्भातही जनतेत दबक्या आवाजात चर्चा असल्याचेही दिसते.
इंदापूर तालुक्यातील जनता आपल्या मतदानातून कशा पद्धतीने या पक्षांना साथ देतील हे पुढील काळच स्पष्ट करेल.

