शिर्डी । प्रतिनिधी :- कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान ऑनलाईन अर्ज भरूनही अद्याप मिळालेले नाही
अशा पात्र लाभार्थीना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार यशोधन जनसंपर्क कार्यालय यांच्या माध्यमातून राहता तालुक्यातील कोरोणामुळे ज्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मयत झाले आहे अशा वारसांना जलदगतीने मदत मिळाली पाहिजे या हेतूने मूळ कागदपत्रे तपासणींचा वैद्यकीय विभागाचा कॅम्प लवकरच शिर्डी लगतच्या सावळी विहीर ब्रुद्रुक येथे असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती काॅग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी केले आहे.
प्रकाश पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की राहता तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोणा महामारी आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या महिला पुरुष व तरुणांची संख्या धक्कादायक आहे या निराधार झालेल्या कुटुंबातील वारसांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाआघाडी सरकारच्या माध्यमातून मोठा पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने मयताच्या वारसांना जलदगतीने ५०हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासकीय स्तरावर मदत सुरू झाली आहे.
काहींना मदत देखील बॅन्कखात्यात जमा झाली असताना काही वारसांच्या तांत्रिक कागदपत्रांच्या अडचणी मुळे मोठ्या प्रमाणावर लोक वंचित आहे हे पुढे आल्यामुळे वंचित राहीलेल्या वारसांना जलदगतीने मदत मिळावी या हेतूने अशा वारसाचा मेळावा लवकरच होणार असून तरी ऑनलाईन अर्ज भरलेल्या मयताच्या वारसांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह लवकरच भव्य असा सावळी विहीर येथे होत असलेल्या कॅम्प मध्ये वारसांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश पगारे यांनी केले आहे.

